Sanjay Jadhav म्हणजे 'कचऱ्याचा डब्बा'?,संजय नार्वेकर भिडले दिग्दर्शकाला..व्हायरल व्हिडीओनं सगळेच हैराण

सोशल मीडियावर सध्या संजय नार्वेकर आणि संजय जाधव यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय,ज्यात दोघेही एकमेकांना टशन देताना दिसत आहेत.
Sanjay Jadhav, sanjay Narvekar
Sanjay Jadhav, sanjay NarvekarEsakal

Sanjay Jadhav Video Reel: दुनियादारी फेम संजय जाधव आणि अभिनेता संजय नार्वेकर ही मराठी इंडस्ट्रीतील दोन नामांकित नावं. त्यामुळे अशा दोन माणसांंमध्ये झालेली तू-तू,मै-मै जेव्हा समोर येते तेव्हा चर्चा तर रंगणारच नाही का?

सध्या संजय जाधव आपल्या आगामी सिनेमाच्या शूटिंग निमित्तानं लंडनमध्ये मुक्काम ठोकून आहे. त्याच सिनेमात संजय नार्वेकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. याच सिनेमाच्या शूटिंग दरम्यान काही तरी झालं आणि संजय नार्वेकर दुनियादारी फेम दिग्दर्शक संजय जाधवला तू कचऱ्याचा डब्बा आहेस..असं चक्क म्हणून गेलेत.

अर्थात असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.तेव्हा चला जाणून घेऊया या व्हिडीओमागचं सत्य.

Sanjay Jadhav, sanjay Narvekar
Kushal Badrike: एखादं प्रोजेक्ट मिळावं म्हणून दिग्दर्शकासमोर काय-काय करावं लागतं.., कुशलनं शेअर केला भन्नाट व्हिडीओ

लंडनमध्ये संजय जाधव ज्या सिनेमाचं शूटिंग करत आहेत त्यात संजय नार्वेकर,कुशल बद्रिके,शिवानी सुर्वे,अभिनय बेर्डे,प्रार्थना बेहरे असे सगळे कलाकार आहेत. गेल्या काही दिवसांपासून हे कलाकार अनेकदा आपले फनी रील बनवून पोस्ट करताना दिसत आहेत.

अशीच एक व्हिडीओ रील या टीमन बनवली आहे.ज्यात प्रार्थना बेहरे,शिवानी सुर्वे,अभिनय बेर्डे,संजय जाधव,संजय नार्वेकर असे कलाकार दिसत आहेत. रीलसाठी सगळे धमाल करत शूट करत असतानाच संजय जाधव असं काही बोलून जातो त्यावरनं नार्वेकर चक्क त्याला कचऱ्याचा डब्बा म्हणून जातात.

Sanjay Jadhav, sanjay Narvekar
Parineeti-Raghav: परिणीती चोप्रा-राघव चढ्ढा या आठवड्यात करणार एंगेजमेंट! दिल्लीत तयारी झाली सुरू
Sanjay Jadhav, sanjay Narvekar
Swwapnil Joshi च्या करिअरमधलं पहिलं व्हिझिटिंग कार्ड व्हायरल.. पाहून चाहत्याची भन्नाट कमेंट..म्हणाला,'आता फक्त...'

या व्हिडीओत आपण पाहू शकतो की कुशल बद्रिकेला शूट लोकेशनवर सगळे कलाकार मिस करतायत. आणि हेच ते संजय जाधवला सांगत असतात. तेव्हा संजय नार्वेकर येऊन काय झालं विचारतात. तेव्हा संजय जाधव मोठेपणा दाखवण्यासाठी बोलतात,''संजयजी,इंडस्ट्रीत कोणाला काही दुःख व्यक्त करायचं असेल तर सगळे माझ्याकडेच येतात..जसे हे आलेयत आता...''

तेव्हा संजय नार्वेकर म्हणतात,''मनात जे दुःख,चिंता साठलीय ती सगळी कचऱ्यासारखी असते आणि कचरा आपण कुठे टाकतो..तेव्हा संजय जाधव म्हणतात..कचऱ्याचा डब्बा...आणि हे बोलल्यावर त्यांना शॉक लागतो''.

कारण नार्वेकर नकळत आपल्या बोलण्यातून संजय जाधवना 'कचऱ्याचा डब्बा' म्हणून जातात. आता हे सगळं व्हिडीओ रीलसाठी आहे बरं का...कुठलाही वाद वगैरे नाही..पण ही व्हिडीओ रील धम्माल आणते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com