Big Boss 13 : सिद्धार्थ-रश्मी यांच्यात हॉट केमिस्ट्री आज रंगणार!

टीम ई-सकाळ
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

'दिलं से दिलं तक' या टीव्ही सिरीयलचा प्रोमो आज दाखवला आहे, ज्यात या दोघांची ऑनस्क्रीन रोमँटिक केमेस्ट्री दिसत आहे. हा प्रोमो रश्मी आणि सिद्धार्थ सोबत सर्वच घरातील सदस्यांनी एन्जॉय करताना दिसत आहेत.

बिगबॉस 13 चे पर्व म्हणजे प्रेक्षकांसाठी पैसा वरून मनोरंजन. या पर्वात कोणीची भांडण, कोणाची मैत्री प्रेक्षकांना पाहायला मिळाली. मागील आठवड्यात बिगबॉसच्या घरात खूप भांडण झाली.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

असीम रियाझ आणि सिद्धार्थ शुक्ला यांनी भांडताना अक्षरशः घर डोक्यावर घेतलं होत. सिध्दार्थ शुक्ला आणि रश्मी देसाई यांच्यात तर 36 चा आकडा आहे. पण, आज प्रेक्षकांना रश्मी आणि सिद्धार्थ यांची ऑनस्क्रीन रोमँटिक केमेस्ट्री पाहायला मिळणार आहे.

- #BobBiswas शाहरूख-अभिषेक पुन्हा एकत्र झळकणार!
 
आज बिगबॉसच्या घरात पहिल्यांदा रश्मी आणि सिद्धार्थ भांडताना नाही तर, हसून खेळून मस्ती करत टास्क करताना दिसणार आहेत. दरम्यान, बी बिगबॉस त्या दोघांना एक खास टास्क देणार आहेत.

- आशुतोष गोवारीकरांच्या सुरक्षेसाठी 200 पोलिस तैनात! कारण वाचा...

'दिलं से दिलं तक' या टीव्ही सिरीयलचा प्रोमो आज दाखवला आहे, ज्यात या दोघांची ऑनस्क्रीन रोमँटिक केमेस्ट्री दिसत आहे. हा प्रोमो रश्मी आणि सिद्धार्थ सोबत सर्वच घरातील सदस्यांनी एन्जॉय करताना दिसत आहेत. त्यानंतर हा रोमँटिक प्रोमो त्यांना रेक्रियेट करण्याचे टास्क बिगबॉसने दिले आहे.  त्यामुळे प्रेक्षकांना  #SidRa म्हणजेच रश्मी आणि सिद्धार्थ मधील ही केमिस्ट्री पुन्हा पाहायला मिळणार आहे. त्यांच्या या केमिस्ट्रीचे लाखो चाहते आहेत. 

 या टास्क मध्ये सिद्धार्थ आणि रश्मीला शेहनाज गिल आणि आरती. मदत करताना दिसत आहे. शेहनाझ आणि रश्मी सिद्धार्थ च्या जवळच्या मैत्रिणी आहेत. या टास्कमध्ये शेहनाज या व्हिडिओ ची डायरेक्टर आहे. ती सिद्धार्थ आणि रश्मीचे रोमँटिक सीन शूट करत आहे. तर आरती सिंग तिला मदत करत आहे.  

- अभिनेत्री श्रुती मराठेने सांगितला अविस्मरणीय अनुभव

#SidNaaj म्हणजेच सिद्धार्थ आणि शेहनाजची जोडीला प्रेक्षकांची पसंती आहे. त्यामुळे त्यांचे चाहते नाराज आहेत.  आज टास्क मज्जा मस्ती करत पार पडतो का नवीन वादाना तोंड फुटते, दिसणार आहे. तसेच या टास्क नंतर सिद्धार्थ आणि रश्मी यांच्यात नव्याने नाते निर्माण होईल की नाही याची प्रेक्षकांना आतुरता आहे.

सिध्दार्थ आणि रश्मीच्या विरुद्ध माहिरा शर्मा आणि विशाल आदित्य सिंग केमेस्ट्री देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  त्यांना या टास्क मध्ये पारस चब्रा मदत करणार आहे.  या दोंघाच्या व्हिडिओ साठी डायरेक्ट करणार आहे. सिद्धार्थ आणि रशमि विरुद्ध विशाल आणि माहेरा यांच्यातही कोणाची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडते या दिसणार आहे. असेच घाटात चा विजेता असेल हे आजक्या एपिसोड मध्ये समजेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sidharth Shukla and Rashami Desai Steamy Romance in Bigg Boss 13