चेहऱ्यावर आनंद देणारे स्वरूप भालवणकरचे गाणे ''लॉकडाऊन मंडी''...

lockdown mandi
lockdown mandi

मुंबई : गायक आणि संगीतकार स्वरूप भालवणकरने आतापर्यंत विविध गाणी बनविली आहेत आणि गायली आहेत. त्याची गाणी आपल्या मनाला स्पर्श करून जातात. आता त्याने 'लॉकडाउन मंडी' हे गाणे आणले असून या गाण्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हे गाणे सद्यस्थितीवर आधारित असून एखाद्या जोडप्याला  घराच्या चार भिंतींमध्येच बंधने आल्यास कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते, असा आशय या गाण्यातून मांडला गेला आहे. 

वैशिष्ट्य म्हणजे, या गाण्याचे संगीत दिग्दर्शन जगमीत बल यांनी केले आहे. विनोदी अभिनेते जॉनी लिव्हर यांचे बंधू जिमी मोझेस आणि स्वरूप भालवणकरवर हे गाणे वर चित्रित झाले आहे. या गाण्याला संगीत स्वरूपने दिले आहे तसेच त्याने आणि जिमीने ते गायले आहे.

या गाण्याबाबत स्वरूप म्हणाला, “लॉकडाऊनने आम्हा सर्वांना भीतीदायक परिस्थितीत टाकले आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर काहीशी घबराट आहे. अशा वेळी  लोकांच्या चेहऱ्यावर हसू येईल आणि आनंद पसरेल अशा एका गाण्याची आवश्यकता होती. ते गाणे आम्हाला मिळाले. या गाण्यातून आम्ही पती- पत्नी यांच्या नात्यामधील भावबंध आणि समस्या आणल्या आहेत. आम्ही स्वतःच्याच बंगल्यात या गाण्याचे चित्रीकरण केले. सध्या बर्‍याच दुःखद बातम्या आणि परिस्थिती समोर येत आहे  म्हणून या गाण्यातून आम्हाला लोकांना आनंद द्यायचा आहे. 

हे गाणे मनावरचा ताण कमी करणारे आहे. मी हे गाणे विनोदी पद्धतीने गायले आहे आणि त्यात नृत्य आणि विनोदही आहे.  मला लॉकडाउन मंडीची रचना आणि गाणे सर्वात जास्त आवडले.  कारण हे गाणे मी वेगवेगळी गाणी कशी गाऊ शकतो हे दाखवत माझे अष्टपैलुत्व व्यक्तिमत्व लोकांसमोर आणण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. हे गाणे सगळ्यांनी नक्कीच ऐकले पाहिजे कारण ते आपल्याला या कठीण काळातही गायला आणि चेहऱ्यावर हसू आणायला मदत करते."

स्वरूप पुढे म्हणाला, "गेल्या तीन महिन्यांत मी चार गाण्यांवर काम केले आहे. पहिले गाणे टी दिन मालिकेतील ये दिन भी ढलेंगे होते, आणि लॉकडाऊन मंडीपूर्वी मी विठ्ठलाच्या एका अभंगवर काम करत होतो. जो 1 जुलैला प्रदर्शित होणार आहे. हा अभंग महाराष्ट्राच्या वारकऱ्यांवर आहे, जे या महिनाभरात पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जातात."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com