esakal | सोनम कपूर आहुजाने सांगितले तिच्या प्रेरणास्त्रोतांबद्दल; जाणून घ्या काय म्हणाली ती...

बोलून बातमी शोधा

sonam kapooq

तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नाही की मी माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात मी जवळजवळ 5 वर्षे दिग्दर्शकाला असिस्ट केले. नंतर जेव्हा मी चित्रपटांमध्ये अभिनय करायला लागले, तेव्हा असा एक चित्रपट ज्याने मला भुरळ घातली तो म्हणजे नीरजा.

सोनम कपूर आहुजाने सांगितले तिच्या प्रेरणास्त्रोतांबद्दल; जाणून घ्या काय म्हणाली ती...
sakal_logo
By
संतोष भिंगार्डे

मुंबई : आजच्या आधुनिक जगात सामाजिक परिवर्तनाचा चेहरा म्हणून ओळख असलेली अभिनेत्री सोनम कपूर आहूजा अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना तिच्या आयुष्याविषयी आणि विचारांविषयी सांगत असते. तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर ती बर्‍यापैकी सक्रिय असते.

लॉकडाऊनदरम्यान मध्य रेल्वेची दमदार कामगिरी; मुंबई विभागाने केली 'इतक्या' लाख वॅगन्सची मालवाहतूक...

याच फॅशन आयकॉनने अलीकडेच त्या दोन स्त्रियांबद्दल खोलवर भाष्य केले ज्या तिला आयुष्यात सर्वात जास्त प्रेरणा देतात. एका पोस्टमध्ये सोनमने हे उघड केले की ती आणि बहीण रिया ए. के. फिल्म सांभाळत आहेत आणि त्यातील अडचणींचा सामना करत
आहेत. तिला  अशोकचक्र पुरस्कार मिळवलेली दिवंगत फ्लाइट अटेंडंट नीरजा भानोत आणि दिवंगत अभिनेत्री फातमा बेगम या सर्वात प्रेरणादायक आहेत असे सोनमने एक पोस्ट शेअर करत सांगितले.

रुग्णवाहिकांकडून लुटमार सुरुच; अवघ्या अडीच किलोमीटरसाठी आकारले तब्बल 'इतके' हजार रुपये...

सोनमने लिहिले की, "तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नाही की मी माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात मी जवळजवळ 5 वर्षे दिग्दर्शकाला असिस्ट केले. नंतर जेव्हा मी चित्रपटांमध्ये अभिनय करायला लागले, तेव्हा असा एक चित्रपट ज्याने मला भुरळ घातली तो म्हणजे नीरजा. मी तिची कथा वाचली, पटकथा वाचली, मी माझे संशोधन केले. नीरजा खट्याळ होती पण त्याहून जास्त ती धैर्यवान होती, ती प्रबळ होती, ती भावनिक आणि संवेदनशीलही होती. या महिलांकडे बघून त्यांच्याबद्दल वाचून त्यांची प्रतिमा किती उंच आहे हेच कळते. 

...तर वीजग्राहकांना होऊ शकतो 750 रुपयांचा दंड; वाचा सविस्तर...

माझी आणखी एक प्रेरणा म्हणजे फातमा बेगम. ती चित्रपटसृष्टीला पुरुषप्रधान मार्गापासून दूर नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. ती कधीच नवीन गोष्टी करून पहायला, नवीन प्रयोग करायला घाबरली नाही. आता रिया आणि मी ए.के फिल्म्सचे नेतृत्व करीत आहोत. हे करताना आम्ही अनेक अडथळ्यांना सामोरे जात आहोत. 

इच्छाशक्तीचा विजय; अवघ्या दहा दिवसांत डोंबिवलीतील 91 वर्षाच्या आजींची कोरोनावर मात...

कारण एकच की आम्ही स्त्रिया आहोत. फातमा यांच्यासारख्या कथा मला आशा आणि उत्तेजन देतात. रिया आणि मला कधीच भीती वाटली नाही.  मला फक्त महिलांना अभिनय, पटकथालेखक, निर्माता आणि दिग्दर्शक होण्याचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी फातमा बेगमचे आभार मानायचे आहेत. तुम्ही त्यावेळी जे काही केले त्याबद्दल धन्यवाद, जेणेकरुन आम्ही आत्ता ते करत आहोत. तुमच्याबद्दल माझ्या मनात किती आदर आहे हे मी शब्दात वर्णन करू शकत नाही. तुम्ही स्त्रीवादी असल्याबद्दल धन्यवाद.
----
संपादन : ऋषिराज तायडे