Samantha Bikini Price: 100 कोटींची पोटगी नाकारली, 34 हजारांची बिकीनी घेऊन करतेय दंगा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tollywood actress samantha

Samantha Bikini Price: 100 कोटींची पोटगी नाकारली, 34 हजारांची बिकीनी घेऊन करतेय दंगा!

Actress Dress Price Tag: टॉलीवूडच्या समंथा आणि नागा चैतन्याचं बिनसलं तेव्हा त्यांच्या लाखो चाहत्यांना कमालीचं वाईट वाटलं होतं. फक्त टॉलीवूडचं नाही तर बॉलीवूडमध्ये देखील त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. समंथानं शेवटी सोशल (Social media viral news) मीडियावरुन असं जाहिर केलं की माझ्यात आणि नागा चैतन्यात कोणत्याही प्रकारचे नाते आहे. आम्ही एकमेकांपासून विभक्त झालो आहोत तेव्हा चाहत्यांना (Entertainment News) खात्री पटली. त्यानंतर मात्र दोघांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली. नागा चैतन्यानं एका मुलाखतीमध्ये समंथावर अप्रत्यक्षपणे काही आरोप केले होते. ज्यावेळी द फॅमिली मॅन नावाच्या वेबसीरिजचा 2 सीझन प्रदर्शित झाला तेव्हापासून त्यांच्यात वाद निर्माण व्हायला सुरुवात झाली असे सांगितले जाते. विभक्त झाल्यानंतर प्रश्न होता पोटगीचा. पण समंथानं ती नाकारली.

समंथानं (Tollywood Actress Samantha) नागा चैतन्याकडून नाकारलेल्या पोटगीचा आकडा होता शंभर कोटी. एवढी मोठी पोटगी नाकारुन समंथानं (Tollywood movies) स्वताच्या बळावर ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या वर्षी तिचा पुष्पा प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये तिनं केलेल्या आयटम (Pushpa Movie) साँगला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी तिचा विजय सेतूपती, नयनतारा यांच्याबरोबर एक विनोदी चित्रपट प्रदर्शित झाला त्यालाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसुन आले आहे. सध्या समंथाच्या आगळ्या वेगळ्या लूकची चर्चा आहे. नागा चैतन्यापासून वेगळं झाल्यापासून ती तिचं आयुष्य आणखी वेगळ्या पद्धतीनं जगु पाहत आहे. तिचा बिकीनी लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियाही आल्या आहेत.

समंथानं परिधान केलेल्या बिकीनीचा प्राईज टॅग व्हायरल झाला आहे. ती बिकीनी 34 हजारांची असल्याचे सांगण्यात आले आहे. यापूर्वी देखील समंथाच्या बोल्ड लूकनं तिच्या चाहत्यांना घायाळ केले आहे. मात्र आता तिच्या बिकीनीच्या प्राईज टॅगनं नेटकऱ्यांना आश्चर्यचकित केलं आहे. सोशल मीडियावर समंथानं तिचा हा बोल्ड लूक व्हायरल केला आहे. ‘द टॉलीवुड क्लोसेट’च्या इंस्टाग्राम पेजवरुन तिच्या बिकीनीचा प्राईज टॅग हा व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहे. पतीकडून शंभर कोटींची पोटगी नाकारुन समंथा 34 हजारांची बिकीनी परिधान करुन दंगा करते आहे असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Entertainment