अल्लु अर्जुनच्या 'पुष्पाचं' रेकॉर्ड, जगभरात कोट्यवधीची कमाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

allu arjun

अल्लु अर्जुनच्या 'पुष्पाचं' रेकॉर्ड, जगभरात कोट्यवधीची कमाई

Allu Arjun Pushpa Movie - अल्लु अर्जुनच्या पुष्पा (pushpa_ या चित्रपटानं प्रेक्षकांना वेड लावलं आहे. दोन आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर (box office) धुमाकुळ घातला आहे. त्याच्यातील गाणी, काही दृश्यं यामुळे पुष्पा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. मात्र या सगळ्यांना प्रेक्षकांनी स्वीकारुन पुष्पाला आपली पसंती दर्शवली आहे. अल्लुच्या पुष्पानं केवळ भारतातच नाही तर जगभरामध्ये कमाईचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. त्याच्या आसपास सध्या तरी कोणताही बॉलीवूडचा, टॉलीवूडचा (tollywood) चित्रपट नाही. बहुचर्चित अशा 83 कडून प्रेक्षकांना अपेक्षा होत्या. मात्र हा चित्रपट सपशेल आदळला आहे.

हिंदी शिवाय पुष्पा आणखी चार भाषांमध्ये (pushpa relased 4 langauges) प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला गेल्या दोन आठवड्यांपासून प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यत पुष्पानं बंपर कमाई केली आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सक्सेस पार्टीचे आयोजन केले होते. त्यावेळी असे सांगण्यात आले की, पुष्पानं तीनशे कोटी रुपयांची कमाई केली आहे. अल्लु अर्जुनच्या पुष्पानं तब्बल तीनशे कोटी रूपयांची कमाई केली आहे. त्यामुळे त्याच्यावर आता नेटकऱ्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे. अजुनही थिटएरमध्ये पुष्पा हाऊसफुल्ल सुरु आहे. येत्या काळातही पुष्पा जोरदार कमाई करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: Movie Review: नादखुळा 'पुष्पा'!, कडक समंथा, भडक अल्लु अर्जुन

चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक जानेवारीला ट्विट करुन माहिती दिली आहे. त्यामध्ये त्यांनी पुष्पा द राईज ही 2021 मधील (Pushpa biggest grosser of 2021) सर्वाधिक कमाई करणारी मुव्ही आहे. असे सांगितलं आहे. ग्लोबल बॉक्स ऑफिसवर पुष्पानं तीनशे कोटींहून अधिक व्यवसाय केला आहे. प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा 'पुष्पा: द राइज' (Pushpa : The Rise) हा चित्रपट 17 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. पुष्पा हा एक तेलुगु चित्रपट असून तो हिंदीतही प्रदर्शित झालाय. हिंदी प्रेक्षकांमध्येही चित्रपटाला भरभरून प्रेम मिळत असल्याचं आकडेवारीवरून दिसून आलं आहे.

हेही वाचा: 83 Movie Review: अविस्मरणीय विजयाची यशोगाथा

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top