2020's Best Web Series: तुम्ही पाहायला हव्यात अशा टॉप-9 वेबसिरीज!

Web_2020
Web_2020

पुणे : कोरोनामुळे चित्रपटगृहे बराच काळ बंद आहेत. त्या दरम्यानच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात काही वेबसिरिज आणि चित्रपट प्रदर्शित झाले. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. खरं तर आता थिएटर मध्ये चित्रपट प्रदर्शित करण्यापेक्षा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहायला मिळल्या आहेत. यापैकी फार थोड्या वेबसिरीज प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या आहेत. त्यातील टॉप 10 टीव्ही शो असे आहेत की जे आवर्जून पाहायला हवेत.

त्याची माहिती खास वाचकांसाठी 2020 हे वर्ष वेगळ्या आशयाच्या आणि विषयाच्या टीव्ही मालिका घेऊन आले होते. त्यात साय फाय, राजकीय, सामाजिक, स्त्री - पुरुष सबंध, संगीत, आरोग्य विषयावर प्रकाश टाकणाऱ्या मालिका यांचा भरणा अधिक होता. क्राईम, लॉ या विषयावरील मालिका यांनाही प्रेक्षकांची चांगली पोचपावती मिळाली होती. भारतातही ऑनलाइन इंडस्ट्री मोठ्या संख्येने विस्तारत गेली आहे. 

1. The Queen’s Gambit -

नेटफ्लिक्सवरील या मालिकेने सर्वांना वेड लावले आहे. आगळी वेगळी कथा, त्यातील अनोख्या स्वभावाची माणसे, याचे दर्शन मालिकेतून पाहायला मिळते. ही कथा म्हटली तर दयाळूपणाची आहे, माणुसकीच्या स्वभावाच्या विविध पैलूंना स्पर्श करणारी मालिका म्हणून अनेकांनी त्याचे कौतुक केले. 

2. Paatal Lok -

भारतीय वेबसिरिजच्या दुनियेत ऑल टाइम बेस्ट वेबसिरीज म्हणून पाताळलोक चा उल्लेख करावा लागेल. गेल्या एक दोन वर्षांपूर्वी नेटफिलक्स वर प्रसारित झालेल्या सेक्रेड गेम्स नंतर सर्वधिक लोकप्रिय मालिका म्हणून पाताळ लोकचा क्रमांक लागतो. सुदीप शर्मा यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे. हिंदू धर्मातील वेगवेगळ्या कथांचे तत्वज्ञान वास्तव जीवनावर कशाप्रकारे आधारलेले आहे हे या मालिकेतून पाहायला मिळते. 

3. Murder on Middle Beach -

एचबीओ या वाहिनीवर असलेल्या या मालिकेने रहस्य, क्राईम, यांचा एक वेगळा बाज रसिकांसमोर मांडला. रहस्यमय पद्धतीने पूढे सरकणारे कथानक, त्याची प्रभावी मांडणी हे सारं काही थक्क करणारे आहे. जाणकार प्रेक्षक आणि रसिक यांनी ही मालिका चुकवू नये. 

4. Jamtara: Sabka Number Ayega -

भारतात दिवसाला हजाराच्या वर सायबर केसेस दाखल होतात. नेट फिशिंगच्या जाळ्यात अडकून लाखो रुपये गमावणाऱ्याची संख्या काही कमी नाही. जमताडा नावाच्या एका लहान गावात होणाऱ्या नेट फिशिंगची थरारक स्टोरी या मालिकेच्या निमित्ताने पाहायला मिळते. आपण विचार करू शकणार नाही इतक्या वेगळ्या पद्धतीने होणारी फसवणूक आणि चोऱ्या यांचा सोर्स काय आहे, हे माहीती करून घेण्यासाठी जमताडा च्या वाट्याला जावे लागेल. 

5. Lovecraft Country -

विषय पूर्णपणे वेगळा, नेहमीच्या विषयांना बाजूला सारून नवीन काही सांगू पाहणारा विचार या मालिकेतून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ब्लॅक स्टोरी टेलिंग म्हणूनही या मालिकेकडे पाहिले गेलं आहे. एका कादंबरीवर आधारित असलेला या मालिकेचा विषय लक्षवेधक आहे. 

6. Never Have I Ever -

नर्मविनोदी, थोड्याशा हळव्या पद्धतीने मांडल्या गेलेल्या नेव्हर हॅव आय एव्हर मालिकेतुन टेनिस लेजेंड जॉन मॅकनरो याचे कथानक आपल्या समोर उलगडत जाते. त्याचा प्रवास, संघर्ष हे सारे प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. 

7. Tiger King -

ही मालिका भलतीच भन्नाट आहे. त्याचा विषयही तितकाच इंटरेस्टिंग आहे. टायगर किंग हा एक व्यक्ती जो त्याच्या आयुष्यात किती वेगवेगळ्या पद्धतीने शिकत गेला आहे, त्याचे समृद्ध अनुभवविश्व याला बोलक्या पद्धतिने या मालिकेतून साकारण्यात आले आहे. 

8. Scam 1992:

The Harshad Mehta Story - चालू वर्षी टॉप रेटिंग म्हणून जेवढ्या वेगवेगळ्या साईटने आपआपली लिस्ट प्रकाशित केली आहे त्यात हर्षद मेहता याच्या आयुष्यावर आधारलेली ही मालिका प्रचंड यशस्वी झाली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले आहे. 

9. ZeroZeroZero -

सुंदर कथा, प्रभावी छायाचित्रण, संवाद यामुळे ही मालिका प्रेक्षणीय झाली आहे. तिला पाहणारा प्रेक्षकवर्गही मोठा आहे. सोशल मीडियावरही या मालिकेचा बोलबाला आहे. मेक्सिकन गँगस्टर, इटालियन माफिया, त्यांच्या घरातील संघर्ष हे सर्व काही झिरो झिरो मालिकेत पाहायला मिळते.

- मनोरंजन क्षेत्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com