औरंगाबाद : पानचक्‍कीजवळील जमीलबेग मशिद येथे मोफत जेवण घेत असलेले गरजू.
औरंगाबाद : पानचक्‍कीजवळील जमीलबेग मशिद येथे मोफत जेवण घेत असलेले गरजू.

रुग्णांसह नातेवाइकांना मोफत भोजन 

औरंगाबाद - संपूर्ण मराठवाडा, खानदेश, नगरसह इतर जिल्ह्यांतून घाटी आणि कॅन्सर रुग्णालयात शेकडो रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक येतात. अशा गरीब आणि गरजूंसाठी गेल्या आठ वर्षांपासून "कुल हिन्द मजलिस-ए-तामीर मिल्लत' संघटनेतर्फे दररोज दोनवेळचे जेवण मोफत दिले जात आहे. 

या सेवेचा दररोज 1200 ते 1600 रुग्णांचे नातेवाईक फायदा घेतात. विशेष म्हणजे येथे रुग्णांसाठी पार्सलची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अब्दुल हलीम हशर यांच्या मार्गदर्शनात 16 नोव्हेंबर 2012 रोजी "कुल हिन्द मजलिस-ए-तामीर मिल्लत' या संस्थेने हा उपक्रम सुरू केला. 

घाटी आणि कॅन्सर रुग्णालयासह शहरातील आठ रुग्णालयांमधील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना दोनवेळचे मोफत अन्न दिले जात आहे. गरीब रुग्णांची तसेच त्यांच्यासोबतच्या नातेवाइकांची जेवणाची परवड होऊ नये यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 

दानशूरांकडून आर्थिक मदत 

संस्थेतर्फे ही सुविधा मोफत दिली जात असल्याने यासाठी खर्चही मोठा येतो. भोजनासाठीचा खर्च समाजातील अनेक दानशूर व्यक्तींच्या योगदानातून भागविला जातो. अनेकजण आपापल्या परीने डाळ, तांदूळ, तेल, गहू, मसाले आणून देतात. यासाठी संस्थेचे शहराध्यक्ष अहमद अल्‌ अमरी, सचिव अब्दुल हलीम हशर नेहमी पुढाकार घेतात. 

मशीद जमील बेग येथे दिले जाते मोफत जेवण 

मोफत भोजनाची ही सुविधा घाटीपासून जवळ असलेल्या पाणचक्की रोड येथील मशीद जमील बेग येथे केली जाते. या ठिकाणी सर्व धर्माचे लोक जेवणासाठी येतात. 

जेवण झाल्यानंतर रुग्णांना पार्सलसुद्धा दिले जाते. कॅन्सर हॉस्पिटल या परिसरापासून दोन किलोमीटर अंतरावर असल्याने तेथून येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांनासुद्धा पार्सल दिले जाते.

 दुपारी 12 ते 1 आणि सायंकाळी 7 ते 8 वाजेच्या दरम्यान नियमित भोजनाची व्यवस्था केली जाते. आतापर्यंत एक लाख दहा हजारांपेक्षा जास्त जणांनी याचा लाभ घेतला आहे. 
 
क्‍लिक करा : " चिवटी ' गाजवतोय विविध फिल्म फेस्टिवल 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com