औरंगाबादेत लॉकडाऊनमध्ये या औषधी दुकान राहणार चोवीस तास खुली! 

Wednesday, 8 July 2020

१० ते १८ जुलै दरम्यान शहरात लॉकडाऊन होणार आहे. या लॉकडाऊनमध्ये केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन सहभागी झाली आहे. या काळात लागणारी मधुमेह व रक्तदाब, थॉयरॅाईड व इतर औषधी दहा दिवसांची खरेदी करुन ठेवावी असेही आवाहनही असोसिएशनने केले आहे. 

औरंगाबाद ः लॉकडाऊनमध्ये किरकोळ व घाऊक औषध विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद ठेवावीत असे आवाहन केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने केले आहे. या लॉकडाऊनमध्ये असोसिएशन सहभागी झाली आहे. या काळात लागणारी मधुमेह व रक्तदाब, थॉयरॅाईड व इतर औषधी दहा दिवसांची खरेदी करुन ठेवावी असेही आवाहनही केले आहे. 

१० ते १८ जुलै दरम्यान शहरात लॉकडाऊन होणार आहे. या काळात गंभीर आजार व तातडीची गरज असणाऱ्या रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून संघटनेने शहरातील निवडक रुग्णालयाचे व रुग्णालयातील औषधी दुकाने या काळात पूर्णवेळ सेवा देतील.

त्याशिवाय अडचण असल्यास संघटना औषधे उपलब्ध करुन देणार आहे. मधुमेह व रक्तदाब, थॉयरॅाईड व इतर नियमित लागणारी औषधी पुढील दहा दिवसांची खरेदी करुन ठेवावी व गैरसोय टाळावी असे आवाहनही असोसिएशनने केले आहे.

हेही वाचा: पठ्ठ्या पोलिसालाच म्हणाला, पैसे द्या नाहीतर तुमचे अश्लिल व्हिडिओ

सर्व किरकोळ व घाऊक औषध विक्रेत्यांनी दुकाने उघडू नये. असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष श्री रावसाहेब खेडकर व सचिव श्री।विनोद लोहाडे यांनी केले. औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्र आणि वाळूज पंढरपूर वगळून जिल्हयात इतर सर्व ठिकाणी औषधी व्यवसाय नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहे. 

हेही वाचा: मुलीला उलटी आली म्हणून बॅंकमॅनेजरने कार थांबवली अन....  

 1. लॉकडाऊनच्या काळात ही औषधी दुकाने २४ तास चालू राहतील - 
 2. कमल नयन बजाज हॉस्पीटल - सातारा परिसर, बीड बायपास रोड. 
 3. सिग्मा हॉस्पीटल - शहानूरमिया दर्गा जवळ. 
 4. हेडगेवार हॉस्पीटल - जवाहर कॉलनी, गजानन मंदीराजवळ. 
 5. धूत हॉस्पीटल - रामनगर, जालना रोड. 
 6. वाय. एस.के हॉस्पीटल - टाऊन सेंटर, सिडको. 
 7. एमजीएम हॉस्पीटल - सेव्हनहिल. सिडको एन-सहा. 
 8. जे. जे. प्लस - अदालत रोड. 
 9. माणिक हॉस्पीटल - जवाहर कॉलनी पोलिस ठाणे जवळ. 
 10. आयकॉन हॉस्पीटल - गणेश कॉलनी. 
 11. सहारा हॉस्पीटल - एमजीएम समोर. 
 12. हायटेक आधार - समतानगर/क्रांतीचौक पोलिस ठाणेसमोर 
 13. एमआयटी - एन -३, सिडको. 
 14. ॲपेक्स हॉस्पीटल - बसय्येनगर एसएफएस शाळेसमोर. 
 15. एम्स हॉस्पीटल - हडको. 
 16. ओरिअन सिटीकेअर - कलश मंगल कार्यालय. न्यु उस्मानपुरा क्रांतीचौक. 
 17. बेबंडे हॅास्पीटल - बीड बायपास. 
 18. शांती नर्सिग होम - कांचनवाडी. 
 19. केअरवेल सुपर स्पेशालिटी हॅास्पीटल. महेशनगर. 

हेही वाचा: आई आजारी, भावांचाही सांभाळ, कर्ता बनून आठवीतली शीतल देतेय कुटूंबाला आधार

हेही वाचा: Video: ‘ती’ राबते, सर्वांचे मन जपते पण तिच्या मनासारखं होतं का?  

हेही वाचा: औरंगाबादेत दोन कोरोनाबाधित कैदी पळाले, कोविड सेंटरमधून केला पोबारा  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Aurangabad Lockdown These Drug Stores Are Open 24 Hours A day 

फोटो गॅलरी