कोरोनामुक्त त्या आईने पाहिलं पोटच्या गोळ्याला डोळाभरुन..पण १४ दिवस भेट दुरुनच!

मनोज साखरे
Wednesday, 29 April 2020

नवजात मुलीची कोरानाची चाचणी निगेटीव्ह आली. पण आई कोरोनाची रुग्ण असल्याने मुलीला संसर्ग होऊ नये म्हणून जन्मानंतर आईपासून दूरच ठेवले होते. रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांनी बाळाचा पोटच्या लेकरासारखा सांभाळ केला. या काळात आईला पोटच्या गोळ्याला पाहण्याची अतोनात इच्छा होती; पण केवळ व्हिडीओ कॉलवरच तिला पाहता आले.

औरंगाबाद - हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईतून ३३ वर्षीय गर्भवती औरंगाबादेत आली. पण या महिलेसह त्यांच्या दोन मुलांना कोरोनाची लागण झाली. डॉक्टरांच्या हाती चाचणीचे पॉझिटिव्ह अहवाल पडताच दुसरीकडे तिला कळा सुरू झाल्या. तिची ‘हायरिस्क’ प्रसूतीही झाली.

बाळही सुखरुप..पण ती कोरोना पॉझिटीव्ह मग आई आणि बाळाची ताटातुट झाली. पोटच्या गोळ्याला प्रत्यक्षात बघताही आले नाही..यासाठी तिला अकरा दिवसांची प्रतिक्षा करावी लागली. ती आज कोरोनामुक्त झाली. तेव्हा तिला तिचे बाळ बघता आले, तेव्हा तिच्या भावना डोळ्यांतून टपकत होत्या.

एका रुग्णवाहिकेतून महिला तिचे मुलं आणि पती मुंबईहुन १० एप्रीलला औरंगाबादेत आले. पण पती वगळता महिला व तिचे दोन मुलं कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा रुग्णालयात १८ एप्रिलला या कोरोना पॉझिटिव्ह महिलेची सिजर प्रसूती झाली. ती आणि बाळही सुखरुप होते.

महाराष्ट्र दिनाबाबत प्रशासनाचा मोठा निर्णय

या नवजात मुलीची कोरानाची चाचणी निगेटीव्ह आली. पण आई कोरोनाची रुग्ण असल्याने मुलीला संसर्ग होऊ नये म्हणून जन्मानंतर आईपासून दूरच ठेवले होते. रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांनी बाळाचा पोटच्या लेकरासारखा सांभाळ केला. या काळात आईला पोटच्या गोळ्याला पाहण्याची अतोनात इच्छा होती; पण केवळ व्हिडीओ कॉलवरच तिला पाहता आले.

ज्येष्ठांना मिळणार घरातच वैद्यकीय सल्ला

पुर्ण उपचारानंतर महिलेचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने आईला व बाळाला आज सुटी झाली. त्यानंतर प्रत्यक्षात तिला आपल्या बाळाला पाहता आले; तेव्हा तिला गहीवरुन आले अन् डोळेही डबडबले.

पण कोरोनातून नुकतीच बरी झाल्याने तिला अजुन १४ दिवस तिला बाळाला दुरुनच पाहावे लागणार आहे. १४ दिवसानंतर ती बाळाला हाताळु शकणार आहे. असे डॉक्टरांनी सांगितले. या लेकराला तिच्या वडीलाकडे डॉक्टरांनी सुपुर्द केले.

HIVप्रमाणे कोरोनाचाही होतो का आरोग्यावर दूरगामी परिणाम - वाचा

क्रिकेटपूर्वी सचिनने केलेय या चित्रपटात काम

सोनिया गांधी म्हणाल्या, सर्व उद्योगांना विशेष पॅकेज द्या

मुख्यमंत्र्यांनी मेडिकल सुरू ठेवले, पण हा पठ्ठ्या काय विकतोय पाहा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad News Mother Corona Free Even a Ten day old Baby Discharged