तुमच्या वाहनाचा विमा खोटा तर नाही ना? सावध राहा !  

विमा वाहन.jpg
विमा वाहन.jpg

औरंगाबाद : वाहनाचा विमा काढताना खरा आणि खोटा विमा यातील फरक करता येणे आवश्यक आहे. दुर्दैवाने भारतात मोठ्या प्रमाणावर खोटा विमा विक्री केला जात आहे. सर्वसामान्य नागरिक याला बळी पडतात. नव्या वाहनाचा विमा वाहन कंपनी करून देत असल्याने फसवणुकीचा प्रश्न नसतो; मात्र जुन्या वाहनांसाठी विमा खरेदी करताना खात्री करावी, अन्यथा पश्चात्तापाची वेळ येऊ शकते. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या (आयआरडीएआय) आकडेवारीनुसार, गेल्या दोन वर्षांत ५३.७ कोटी रुपयांचे खोटे वाहन सुरक्षा विमा विकले गेले. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गेल्यावर्षी संसदेत दिलेल्या माहितीनुसार आणि आयआरडीएच्या आकडेवारीनुसार २०१६-१७ मध्ये ४९८ खोटे विमा विकले गेले. २०१७-१८ मध्ये ही फसवणुकीची संख्या वाढून ८२३ झाली. तर २०१८-१९ मध्ये आणखी संख्या वाढून ११९२ चा टप्पा पार करून पुढे गेली. 

खोट्या विम्याचे तोटे 
खोट्या विम्याचे सर्वाधिक प्रकार ट्रकचालक आणि दुचाकी वाहकांच्या बाबतीत घडतात. खोटा विमा अशा लोकांनी खरेदी केले ज्यांना प्रवासादरम्यान पोलिसांच्या तपासणीपासून वाचायचे होते. एका वैध विम्याची किंमत १० हजार रुपयांपर्यंत असेल तर खोटा विमा केवळ ५ ते ६ हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी किमतीत मिळू शकतो. खोटा विमा घेणाऱ्या बहुतांश ग्राहकांना संबंधित विमा केवळ पोलिस तपासणीत उपयोगी पडणार आहे. हे माहिती असल्याचेही समोर आलेले आहे. 

दंड होऊ नये म्हणून 
देशातील जवळजवळ ७० टक्के वाहने विनाविमा सुरू आहेत. आयआरडीएने म्हटले आहे, की २०१६ मध्ये काही कंपन्यांकडून खोटा विमा विकल्याच्या तक्रारी आल्या. त्यातील सर्वाधिक विमा जुन्या वाहनांसाठी खरेदी करण्यात आले होते. त्याचा उद्देश दंडापासून वाचणे असा होता. 

खरा आणि खोटा विमा 
वाहन विमा खरेदी करताना जागरूक राहणे आवश्यक आहे. विमा केवळ ओळखीच्या व्यक्तीकडूनच खरेदी केला पाहिजे. जर ऑनलाइन विमा खरेदी करणार असेल तर संबंधित कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी केला पाहिजे. विमा खरेदी करताना केवळ धनादेश किंवा ऑनलाइन व्यवहाराचाच उपयोग करावा. शक्यतो विमा कंपनीच्या कार्यालयात जाऊन विमा खरेदी करणे श्रेयस्कर आहे. 

अशी करा खात्री 
वाहनासाठी विमा घेतल्यानंतर याबाबत ई-मेल किंवा ‘एसएसएस’द्वारे माहिती मिळते. माहिती न मिळाल्यास विमा कंपनीच्या कॉल सेंटरला कॉल करून शहनिशा करता येते. एखाद्या कंपनीच्या विम्यावर संशय असेल तर आयआरडीएच्या वेबसाइटवर परवानाधारक कंपन्यांच्या यादीत संबंधित कंपनी आहे का, याची खात्री करावी. त्याचप्रमाणे विमा पॉलिसीवरील क्यूआर कोड मोबाईलद्वारे स्कॅन करूनही माहिती तपासता येते. 

(संपादन-प्रताप अवचार)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com