esakal | औरंगाबादेत प्लाझ्मा थेरपीची पहिला प्रयोग 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

काही दात्यांनी प्लाझ्मा दान केल्यानंतर सर्व सोपास्कार पार पाडल्यानंतर आज थेरपीचा दिवस ठरला. त्यानुसार, आज दुपारी रांजणगाव येथील ४२ वर्षीय रुग्णावर प्लाझ्मा थेरपी करण्यात आली. त्यांना मधुमेह व उच्च रक्तदाब आहे. त्यांना तीन दिवसांपासुन ताप, खोकला व दम्याच्या त्रास सुरु झाला. 

औरंगाबादेत प्लाझ्मा थेरपीची पहिला प्रयोग 

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद ः आयसीएमआरच्या मान्यतेनंतर शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीच्या प्रयोगासाठी जोरात प्रयत्न सुरु होते. त्यानंतर आज (ता. १४) पुणेनंतर आता मराठवाड्यातील पहिल्या-वहिली प्लाझ्मा थेरपी एका ४२ वर्षीय रुग्णावर झाली आहे. हा रुग्ण गंभीर असुन येत्या ४८ तासातील रुग्णाच्या प्रकृतीतील बदलांची नोंदही घेतली जात आहे. 

शहरातील एका खासगी रुग्णालयाने प्लाझ्मा थेरपीच्या क्लिनिकल ट्रायलसाठी आयसीएमआरकडे मान्यता मागितली होती. परंतु त्यांना तेव्हा मिळाली नाही. त्यानंतर घाटी रुग्णालयाने स्वतंत्र पातळीवर प्रस्ताव दाखल केल्यानंतर क्लिनिकल ट्रायलला मान्यता मिळाली. यानंतर घाटीत प्लाझ्मादानासाठी समितीही गठीत करण्यात आली. 

काही दात्यांनी प्लाझ्मा दान केल्यानंतर सर्व सोपास्कार पार पाडल्यानंतर आज थेरपीचा दिवस ठरला. त्यानुसार, आज दुपारी रांजणगाव येथील ४२ वर्षीय रुग्णावर प्लाझ्मा थेरपी करण्यात आली. त्यांना मधुमेह व उच्च रक्तदाब आहे. त्यांना तीन दिवसांपासुन ताप, खोकला व दम्याच्या त्रास सुरु झाला. 

महापालिकेची ही शाळा आहे खासगीच्या तोडीस तोड   

१२ ऑगस्टला ते घाटी रुग्णालयात भरती झाले. त्यांची कोवीड चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना आयसीयुत भरती करण्यात आले. त्यांना सायटोकाइन स्टार्म असुन त्यांना तिव्र स्वरुपाचा कोवीड आजार आहे. त्यांचा रक्तगट एबी पॉझिटीव्ह आहे. त्यांना आज प्लाझ्मा देण्यात आला. 

गरज भासल्‍यास दुसरा डोस देणार 
प्लाझ्मा देण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकाची संमती घेण्‍यात आली. त्यांनी दिल्यानंतर ही प्रक्रीया पार पाडली. गरज पडल्यास गुरुवारी (ता. १४) रुग्णाला दुसरा डोस देण्यात येईल. या प्रक्रीयेसाठी डॉ. कैलास चितळे, डॉ. किरण नांदेडकर, डॉ. अनील जोशी, डॉ. मुळे, डॉ. चंद्रकांत यांची मदत लाभली. 

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं   

प्लाझ्मा थेरपी प्रायोगिक तत्वावर आहे. त्यामुळे याबद्दल बोलणे हे फार लवकर होईल. सकारात्मक अपेक्षा ठेवुन रुग्णाला प्लाझ्मा दिला आहे. येत्या ४८ तासांत काही बाबी समजुन येतील. ः डॉ. कानन येळीकर, घाटी रुग्णालय. 

हेही लक्षात असु द्या