पेन्शन फंडाचे आमिष दाखवत माजी कनिष्ठ अभियंत्याला महिलांनी घातला एक लाखाचा गंडा 

सुषेन जाधव
Monday, 7 September 2020

भारत सरकारने तुमच्या भविष्यनिर्वाह निधीच्या रकमेची संचिका रद्दबातल करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारमार्फत आमच्या विभागाकडे पाठवली आहे. संचिकेत त्रुटी असल्याने ती रद्द होऊ नये, यासाठी तुम्हाला सव्वातीन लाखाच्या दहा टक्के रक्कम विभागाच्या खात्यावर विनाविलंब भरावी लागणार आहे. असे धमकावत दिल्लीतील दोन महिलांनी महावितरणच्या निवृत्त कनिष्ठ अभियंत्याला एक लाख चार हजाराचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

औरंगाबाद: भारत सरकारने तुमच्या भविष्यनिर्वाह निधीच्या रकमेची संचिका रद्दबातल करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारमार्फत आमच्या विभागाकडे पाठवली आहे. संचिकेत त्रुटी असल्याने ती रद्द होऊ नये, यासाठी तुम्हाला सव्वातीन लाखाच्या दहा टक्के रक्कम विभागाच्या खात्यावर विनाविलंब भरावी लागणार आहे.

हेही वाचा- Video: ‘ती’ राबते, सर्वांचे मन जपते पण तिच्या मनासारखं होतं का?

असे धमकावत दिल्लीतील दोन महिलांनी महावितरणच्या निवृत्त कनिष्ठ अभियंत्याला एक लाख चार हजाराचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

चंद्रशेखर दिगंबर दामोधरे (६०, रा. एन-३) हे महावितरणमधून कनिष्ठ अभियंता म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांना २० ऑगष्ट २०१८ रोजी सायंकाळी फोनवर दिल्लीतील महिला शनया कौर हिने संपर्क साधला. त्यावेळी तिने पेन्शन फंड रेग्युलेरिटी डेव्हलपमेंट अ‍ॅथोरिटी येथून बोलत आहे. असे सांगत सविस्तर माहिती मागितली.

हे वाचलंत का- तिला म्हणाले, प्राध्यापकाची नोकरी लावतो, १७ लाखही उकळले, शेवटी तिनेच...

सेवा निवृत्तीबाबत पुर्ण माहिती सांगत महाराष्ट्र शासनाने तुम्हाला भारत सरकारच्या वतीने मिळणारी भविष्य निर्वाहनिधीची रक्कम तीन लाख दहा हजार ६४८ रुपयांची संचिका राज्य शासनाने रद्द बातल करण्यासाठी आमच्या विभागाकडे आली आहे. या संचिकेत त्रुटी असल्याने ती रद्दबातल होणार आहे. ही संचिका रद्द करावी का? असे विचारताच तिला दामोधरे यांनी संचिका रद्द करु नका, संचिकेतील त्रुटी काय आहे ते मी पूर्ण करतो असे म्हणाले.

वेळोवेळी महिलेने फोन केल्यानंतर ४ सप्टेंबर २०१८ रोजी दामोधरे यांनी पुन्हा बँक खात्यावर आरटीजीएसद्वारे रक्कम जमा केली. त्यानंतर स्नेहा सिंगने दर सोमवारी संपर्क साधून तुमची संचिका मंजुर होत असल्याचे आश्वासन दिले. 

हेही वाचा- कचऱ्याप्रमाणे व्हेंटीलेटर जिल्ह्यात टाकू दिले, खासदार जलील असे का म्हणाले?

संशय बळावला अन् सत्य समोर आले 

२० सप्टेंबर २०१८ रोजी तिने पुन्हा फोन करुन सांगितले कि, तुमची संचिका मंजूर झाली आहे. परंतू सेवा शुल्कापोटी तुम्हाला आणखी २५ हजार रुपये भरावे लागणार आहे. त्यामुळे दामोधरे यांना संशय आला. त्यांनी पेन्शन फंड रेग्युलेरिटी डेव्हलपमेंट अ‍ॅथोरिटीच्या वेबसाईट तपासणी केली. तेव्हा फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तोपर्यंत त्यांना दोन महिलांनी एक लाख चार हजारांना गंडा घातला होता. दामोधरे यांनी रविवारी पोलिसात धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास जवाहरनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील करत आहेत.

हेही वाचामध्य प्रदेशच्या भाचीला ६ वर्षांनी सापडली महाराष्ट्रात मामी, एका फोनवर पोलिसांनी घेतला शोध


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Former Junior Engineer Was lured by Pension Fund to The Tune Of Rs One Lakh