बबनराव लोणीकरांचे बोलणे आक्षेपार्ह्यच : चित्रा वाघ 

मनोज साखरे
Sunday, 2 February 2020

पक्ष कोणताही असो कोणत्याही नेत्याने भाषणाच्या ओघात, बोलण्याच्या भरात अथवा अगदी गमतीतही शब्दांचा प्रयोग करताना सावधगिरी बाळगायला हवी. निटपणे मोजून मापून शब्द बोलायला हवेत. लोणीकरांनी केलेल्या वक्तव्याचे मी समर्थन करणार नाही

औरंगाबाद : परतूर विधानसभा मतदार संघाचे माजी मंत्री व आमदार बबनराव लोणीकरांनी एका कार्यक्रमात व्यासपिठावर केलेले वक्तव्य आक्षेपार्हच आहे.

त्याचे समर्थन केले जाऊ शकत नाही. या सर्व गोष्टी सुमोटोअंतर्गत येतात, त्याचे महिला आयोगही यात निश्‍चितपणे दखल घेईल अशी बाब भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी औरंगाबादेत केले. 

जालना जिल्ह्यात घडलेल्या छेडछाडीच्या प्रकरणानंतर त्या रविवारी (ता. 2) औरंगाबादेत विशेष पोलिस महानिरीक्षकांना निवेदन देण्यासाठी आल्या होत्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. एकप्रकारे त्यांनी लोणीकर यांना घरचा आहेरच दिला आहे. 

परतूर तालुक्‍यातील वीज उपकेंद्राच्या लोकार्पण सोहळ्यात बबनराव लोणीकर यांचे आक्षेपार्ह्य वक्तव्य व्हायरल झाले. शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपयांची नुकसान भरपाई हवी असेल तर मोठा मार्चा काढावा लागेल.

मोर्चासाठी कुणाला आणू हे तुम्ही सांगा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आणु का प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आणू की एखादी हिरोईन आणू..जर हिरोईन मिळाली नाही तर आपल्या स्टेजवर बसलेल्या तहसिलदार मॅडम हिरोईनच आहेत. त्याही हिरोईनसारख्या दिसतात. अस वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते.

हेही वाचा : 
आपल्या तहसिलदार मॅडॅम हिरोईनसारख्याच दिसतात. 

हिरोईन या शब्दाचा अर्थ डॅशिंग आणि कर्तबगार होतो -बबनराव 

विशेष म्हणजे या वक्तव्याचे समर्थन करणारा त्यांचाच एक व्हिडीओ पुढे आला. त्यात ते माझ्या वाक्‍याचं भांडवल करू नका, हिरोईन या शब्दाचा अर्थ डॅशिंग आणि कर्तबगार महिला असा होतो. हिरोईन शब्दाचा अपमान करु नका असे म्हणत ते त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.

 याविषयी चित्रा वाघ म्हणाल्या, ""पक्ष कोणताही असो कोणत्याही नेत्याने भाषणाच्या ओघात, बोलण्याच्या भरात अथवा अगदी गमतीतही शब्दांचा प्रयोग करताना सावधगिरी बाळगायला हवी. निटपणे मोजून मापून शब्द बोलायला हवेत. लोणीकरांनी केलेल्या वक्तव्याचे मी समर्थन करणार नाही. ते जे बोलले ते आक्षेपार्ह्यच आहे.

अशा घटनांचे कुणीही समर्थन करणार नाही.'' असे त्या म्हणाल्या. या प्रकरणाची दखल घ्यावी अशी विनंती महिला आयोगाला करणार आहात का या प्रश्‍नावर त्या म्हणाल्या, ""या सर्व गोष्टी सुमोटो अंतर्गत येतात. त्यामुळे महिला आयोगही यात निश्‍चितपणे दखल घेईल. 

पोलिसांकडे आयपीसी, सीआरपीसीसह सर्व कायदे आहेत. सुमोटोअंतर्गत काय करायचे, कुणावर काय गुन्हे नोंद करायचे याचे सर्व अधिकार पोलिस प्रशासनाला आहेत. ते जे योग्य वाटेल ते करतील. ज्या महिलेविरुद्ध लोणीकर बोलले आहेत, त्या महिलेची कशी तक्रार असेल त्यापद्धतीने कारवाई होईल. त्यात कुणी पुढे येईल असे मला वाटत नाही.'' असेही त्या म्हणाल्या. 

महानिरीक्षकांना निवेदन 

नेत्या चित्रा वाघ यांच्यासह भाजपचे आमदार अतूल सावे, आमदार संतोष दानवे, ऍड. माधूरी आदवंत, अनुपमा पाथ्रीकर यांच्या शिष्टमंडळाने विशेष पोलिस महानिरीक्षक रविंद्र सिंगल यांची रविवारी भेट घेतली.

जालनातील गोंदेगाव येथे घडलेल्या प्रकरणात पोलिस अधिक्षकांचे निलंबन करावे. घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला त्यात सायबर ऍक्‍ट लावला नव्हता तो लावावा. ज्या-ज्या वॉटसऍप ग्रूपमधून हा व्हिडीओ व्हायरल झाला, त्या-त्या ग्रूपच्या ऍडमीनवर कारवाई करावी अशा मागण्या त्यांनी सिंगल यांच्याकडे शिष्टमंडळाने केल्या. 

हेही वाचा - 

एका क्‍लिकवर वाचा औरंगाबादची गुन्हेगारी     

नाशिकच्या मुलीसोबतही झाला होता तो प्रकार!

याच्यावर आहे चाळीसपेक्षा अधिक गुन्हे औरंगाबादेतून चोरले होते सत्तर तोळे सोने 

चौघींच्या दादल्याने टाकले एकीच्या खात्यात 14 लाख अन..मग असं झालं 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Minister Babanrao Lonikar's Objectionable Statement Case