नव्या धोरणात सर्वसमावेशक अमुलाग्र बदल : डॉ. बी. ए. चोपडे 

Dr. B.A.Chopade.jpg
Dr. B.A.Chopade.jpg

औरंगाबाद : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे २१ व्या शतकातील भारताच्या आकांक्षा परिपूर्ण करणारे सर्वसमावेशक असे आहे. प्रारंभिक बाल्यावस्थेतील शिक्षणापासून ते उच्च विद्यापीठीय शिक्षणामध्ये भरीव बदल केलेले आहेत. असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी व्यक्त केले.

डॉ. चोपडे म्हणाले, उच्च शिक्षणामध्ये तीन व चार वर्षांचे पदवी अभ्यासक्रम निर्माण केले आहेत. पदवीपूर्व शिक्षणासह संशोधनावर अधिक भर देण्यात आला आहे. संशोधन व नवनिर्मितीला चालना देण्यासाठी नॅशनल रिसर्च फाउंडेशन या राष्ट्रीय संस्थेची स्थापना करण्यात येणार आहे. हा निर्णय सर्व क्षेत्रातील संशोधनास एक वरदान ठरणार आहे. यासाठी २२ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे भारतीय संशोधनाचा ठसा जागतिक पातळीवर उमटण्यास खूप मदत होणार आहे. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

 यापुढे फक्त बहूविद्याशाखा असलेल्या विद्यापीठाला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे आंतरविद्या व इतर अनेक शाखेमध्ये मिळून एकत्रितपणे नावीन्यपूर्ण संशोधन खूपच चालना मिळणार आहे. विद्यापीठाशी असलेले महाविद्यालयांचे संलग्नीकरण पंधरा वर्षाच्या काळात टप्प्याटप्प्याने बंद करून अशा महाविद्यालयांना नॅक मूल्यांकनाच्या आधारावर स्वायत्तता देण्याची कल्पना मांडलेली आहे. त्यामुळे आता विद्यापीठांनी नाविन्यपूर्ण संशोधन व अध्यापनावर लक्ष केंद्रित करण्याची मोठी संधी मिळणार आहे.

समाजातील सर्व घटकांना न्याय व सर्वसमावेशक दर्जेदार शिक्षण मिळणार आहे. देशातील वंचित प्रदेशांमध्ये विशेष शैक्षणिक झोन उभारण्यात येणार आहेत. यासाठी केंद्र शासन, राज्य शासन आर्थिक सहाय्य पुरवणार आहे. तसेच मूल्य आधारित शिक्षण व भारतीयत्वाचा अभ्यासक्रमांमध्ये समावेश केलेला आहे. एकंदरीत हे धोरण खूप महत्त्वकांक्षी आहे. याची अंमलबजावणी झाल्यावर भारत निश्चितपणे जगातील महान ज्ञानसत्ता बनेल. याची खात्री वाटते.

सध्या भारत ही जगातील पाचव्या क्रमांकाची आर्थिक सत्ता आहे. त्यामुळे आता शिक्षणावर भरीव गुंतवणूक करणे शक्य होणार आहे. अंमलबजावणीसाठी प्रक्रिया सुरू केलेली आहे. आता सर्व भारतीयांनी यामध्ये भरीव योगदान देण्याची आवश्यकता आहे.

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com