esakal | CoronaUpdate: औरंगाबादेत आणखी सहा बळी; ३२ बाधितांची भर
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना आणि अन्य आजारांच्या बळींचे सत्र थांबता थांबत नसल्याचे चित्र असून, बुधवारी (ता. २७) सहा जणांचा मृत्यू झाला.

CoronaUpdate: औरंगाबादेत आणखी सहा बळी; ३२ बाधितांची भर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोना आणि अन्य आजारांच्या बळींचे सत्र थांबता थांबत नसल्याचे चित्र असून, बुधवारी (ता. २७) सहा जणांचा मृत्यू झाला. यात मकसूद कॉलनी येथील ज्येष्ठ नागरिक, इंदिरानगर बायजीपुरा येथील ५६ वर्षीय पुरुष, हुसेन कॉलनीतील ३८ वर्षीय पुरुष, माणिकनगर गारखेडा परिसरातील ७६ वर्षीय महिला, रोशनगेट भागातील ६४ वर्षीय पुरुष, रहिमनगरातील ५५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. औरंगाबादेतील मृतांची संख्‍या आता ६५ वर गेली आहे.

क्लिक करा- घाबरू नका, तब्बल नव्वद टक्के रुग्ण ठणठणीत बरे होणार
 
सलग सहाव्या दिवशी पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत कमालीची घट दिसून आली. गत पाच दिवसांत अनुक्रमे ३२, ३०, ३७, २०, ३० रुग्ण आढळल्यानंतर आज ३२ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात सिल्लोड, गंगापूर तालुक्यांतही प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. बाधितांची एकूण संख्या १ हजार ३६२ झाली आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, पूर्वीपेक्षा टेस्टिंगचेही प्रमाण आता कमी झाले आहे.

६० वा मृत्यू : इंदिरानगर, बायजीपुरा येथील ५६ वर्षीय पुरुषाला २५ मे रोजी रात्री अकराच्या सुमारास घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ताप, दमा, खोकला लक्षणे होती. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले होते. प्रकृती खालावल्याने ‘घाटी’च्या कोविड रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.

हेही वाचा: बाहेरून आले अन् रुग्ण वाढले - चिरंजीव प्रसाद

कोरोना चाचणीसाठी स्वॅब नमुने घेऊन व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यांना पूर्वीपासून मधुमेह, उच्च रक्तदाबही होता. उपचार सुरू असताना २५ मे रोजी रात्री बाराच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. कोरोना अहवाल प्रलंबित असल्याने मृतदेह शवागारात ठेवण्यात आला. काल कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.

६१ वा मृत्यू : हुसेन कॉलनी येथील ३८ वर्षीय पुरुषाला घाटी रुग्णालयात २४ मे रोजी सांयकाळी साडेसहाच्या सुमारास दाखल करण्यात आले. दमा, खोकला, ताप, छातीत धडधड आदी लक्षणे होती. ऑक्सिजनचे प्रमाणही ६० टक्के इतकेच होते.

क्लिक कराकुणाला ताप, कुणाला सर्दी...औरंगाबादेत भाजी विक्रेत्यांची तपासणी

कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. २४ मे रोजी स्वॅब नमुना घेण्यात आला. २५ मे रोजी सकाळी अहवाल पॉझिटिव्ह आला. व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. न्युमोनिया झाल्यानंतर २६ मे रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

६२ वा मृत्यू : मकसूद कॉलनी येथील ६५ वर्षीय पुरुषाचा कोरोना आणि इतर व्याधींनी आज पहाटे मृत्यू झाला. त्यांना १९ मे रोजी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २० मे रोजी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. कोविडची बाधा, न्युमोनिया, अवयव निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती खासगी रुग्णालयाकडून देण्यात आली.

क्लिक करा: सावधान!! कोविडच्या मृत्युदरात औरंगाबाद देशापेक्षाही आहे पुढे

६३ वा मृत्यू : माणिकनगर गारखेडा परिसरातील ७६ वर्षीय महिलेचा खासगी रुग्णालयात आज दुपारी एकच्या सुमारास मृत्यू झाला. तिच्यावर १९ मेपासून उपचार सुरू होते. आधीपासून उच्च रक्तदाब होता. २१ मे रोजी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. कोविड, न्युमोनिया, अवयव निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती खासगी रुग्णालयाने दिली.

६४ वा मृत्यू : रोशनगेट येथील ६४ वर्षीय पुरुषाचा आज रात्री आठच्या सुमारास खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना २० मे रोजी दाखल करण्यात आले होते. आधीपासूनच उच्चरक्तदाब, मधुमेहाचा त्रास होता. कोविड, न्युमोनिया, अवयव निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती खासगी रुग्णालयाने दिली.
६५ वा मृत्यू : घाटी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रहिमनगरातील ५५ वर्षीय पुरुषाचा आज मृत्यू झाला.

बुधवारी आढळलेले रुग्ण- परिसर (कंसात रुग्णसंख्या) ः गंगापूर (१), मिसारवाडी (१), सिद्धेश्वरनगर, जाधववाडी (१), शहानवाज मस्जिद परिसर (१), सादातनगर (१), भवानीनगर, जुना मोंढा (१), जुना बाजार (१), जहागीरदार कॉलनी (२), ईटखेडा परिसर (१), जयभीमनगर (१), शिवशंकर कॉलनी (२), सुभाषचंद्र बोसनगर (४), अल्तमश कॉलनी (१), शिवनेरी कॉलनी एन-९ (१), टिळकनगर (१), एन- ४ सिडको (१), रोशनगेट परिसर (१), सादाफनगर रेल्वेस्टेशन परिसर (१), हमालवाडी, रेल्वेस्टेशन परिसर (१), भाग्यनगर (१), जयभवानीनगर (३), समतानगर (१), सिल्लोड (१), इतर (२)

हे वाचंलत का? - आता पाच मिनिटांत कोरोनाचे निदान; राज्यातील पहिलाच प्रयोग