हूज आफ्रेड ऑफ व्हार्जिनिया वुल्फ : काय ते वाचा

photo
photo

औरंगाबाद : हूज आफ्रेड ऑफ व्हार्जिनिया वुल्फ? : कुठलीही कलाकृती समजून घेण्यासाठी तिचा कालखंड, त्या निर्मात्याची पार्श्वभूमी, तत्कालीन परिस्थिती, मूल्यव्यवस्था आदींची माहिती असणं नितांत गरजेचं असतं; अन्यथा नाटक म्हणून मंचावर जे आपल्यासमोर सादर होतंय ते समजणं अवघड असतं. दुर्बोध असतं. नाटक या मर्यादित वेळेत सादर होणाऱ्या दृक्‌श्राव्य माध्यमात तर पार्श्वभूमी माहीत असेल तरच आपण त्या कलाकृतीचा आस्वाद घेऊ शकतो. 

प्रस्तुत "हूज आफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वुल्फ' या नाट्यासंदर्भात हे खूप लागू आहे. कारण व्हर्जिनिया वुल्फ कोण? मूळ लेखक एडवर्ड एल्वी कोण? दोघांच्या भूमिकेत फरक काय? त्यांचा जमाना, त्यावेळची परिस्थिती आदीबाबत इंग्रजी साहित्याचा मोजक्‍या अभ्यासकांनाच (असल्यास) त्याबद्दल माहिती असू शकते. एरव्ही कुणाला त्याच्याशी काही देणेघेणे असत नाही. या पार्श्वभूमीवर प्रस्तुत नाट्यकृती नीट पोचविली का? याबद्दल काही मतप्रदर्शन करणे योग्य ठरणारे नाही. 

व्हर्जिनिया वुल्फ ही सव्वाशे-दीडशे वर्षांपूर्वीची एक गाजलेली ब्रिटिश लेखिका, स्त्रीवादी, निरिश्‍वरवादी भूमिकेबद्दल ती आणि तिचे लेखन त्याकाळी गाजलेले. प्रस्तुत नाटकाचा लेखक एडवर्ड एल्वी हा साठच्या दशकात अमेरिकेतील नाट्यचळवळीतील एक महत्त्वाचा लेखक. त्याच्या तीन नाटकांना साहित्य क्षेत्रातील पुरस्कार मिळालेले. द झू स्टोरी, थ्री टॉल विमेन ही त्याची अल्प गाजलेली नाटके. वैवाहिक जीवनातील गुंतागुंत, विशेषतः मूलबाळ न झाल्याने पती-पत्नी नातेसंबंधात आलेले नैराश्‍य, सोबत राहून, एकत्र राहूनही त्या नात्यात आलेला एकप्रकारचा कोरडेपणा, मग निपुत्रिकतेचं आपलं दुःख दारूच्या प्याल्यात बुडविण्यात आणि काल्पनिक पुत्राचे मनोराज्य करण्यात चाललेले अर्थशून्य दिवस अशी सगळी गुरफट एल्वीने या नाटकात मांडलीय. 

व्हर्जिनिया वुल्फ ही लेखिका अशा परिस्थितीत माणसाची घाबरगुंडी उडते तो परिस्थितीला शरण जातो, अशी भूमिका तिच्या लेखनातून मांडीत असे. एल्वीची भूमिका मात्र शरण न जाता त्या परिस्थितीला सामोरे जाणे, मार्ग काढणे, निदान तसा प्रयत्न करणे अशी आहे आणि म्हणून या नाटकाचे शीर्षक असे असावे. 

हूज आफ्रेड ऑफ व्हार्जिनिया वुल्फ? 

- मूळ लेखक : एडवर्ड एल्वी 
- अनुवाद : वर्धन कामत 
- दिग्दर्शक : अनिरुद्ध दांडेकर 
- नेपथ्य : प्रवीण लायकर 
- संगीत : महेश गवंडी 
- प्रकाशयोजना : प्रदीप माने 
- कलावंत : अनिरुद्ध दांडेकर, कादंबरी माळी, पराग फडके आणि प्रणाली नागरे. 
- सादरकर्ते : रंगयात्रा नाट्यसंस्था, इचलकरंजी 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com