अभिमानास्पद : औरंगाबादचे वैद्य नेवपूरकर यांच्या 'मज्जास्नेह' ला मान्यता

dr nevpurkar 12.jpg
dr nevpurkar 12.jpg

औरंगाबाद : शहरातील प्रसिद्ध आयुर्वेद चिकित्सक वैद्य संतोष नेवपूरकर व वैद्य अनघा नेवपूरकर यांचे भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने प्रोसेस पेटंट मान्य केले आहे.

वैद्य नेवपूरकर यांचेकडे १९९३ साली रक्त तयार होत नाही, अशा प्रकारची तक्रार घेऊन रुग्ण आला होता. त्यावरती केलेल्या उपचारातून व आयुर्वेदातील चरक संहिता या ग्रंथाच्या आधाराने मज्जास्नेह असे आयुर्वेदीय औषध नेवपूरकर दांपत्याने तयार केले. औषध हे अनेक रुग्णांमध्ये वापरले व त्याचा चांगला उपयोग होत असल्याने ह्या औषधाच्या पद्धतीबद्दल स्वामीत्व हक्क याद्वारे याचे पेटंट २०१३ साली नोंदवले होते.

नेवपूरकर दाम्पत्याच्या या यशाचे जयंत देवपूजारी, विनय वेलणकर, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे श्रीकांत देशमुख, रजनी गोखले, चिकित्सा परिषदेचे आशुतोष गुप्ता, विलास जाधव, डॉ. ल. का. मोहरीर, सोहन पाठक, आनंद कट्टी, परेश देशमुख, रवींद्र बोर्डे, भैरव कुलकर्णी, पंकज मुळे, संदीप औते, सौ. चमरगोरे, देवयानी सदावर्ते, अतुल मुरुगकर, अश्विनी पाठक, शुभांगी सोनवटीकर यांनी अभिनंदन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com