तीन मेपासून राज्यात सुरु होणार ऊनसावलीचा खेळ

Aurangabad news
Aurangabad news

औरंगाबाद : वर्षातले दोन दिवस असे येतात, ज्या दिवशी आपली सावली दिसत नाही. औरंगाबादकरांना हा अनुभव १९ मे २०२० रोजी अनुभवता येणार आहे. सध्या उत्तरायण सुरु असून मे महिनाचा कडक उन्हाळा सुरु आहे. त्यामुळे राज्यातील विविध शहरातही हा अनुभव दरदिवशी घेता येणार आहे. 

सुर्य बरोबर आपल्या डोक्यावरुन जातो. त्यावेळी उन्हात असलेल्या व्यक्तीची किंवा वस्तुची सावली पुढे-मागे न पडता खाली पायातच पडते. त्यामुळे काही क्षण सावली गायब होते. या घटनेला खगोलशास्त्रीय भाषेत 'झीरो शॅडो' असे म्हटले जाते. 

महाराष्ट्रात तीन ते ३१ मे पर्यंत शून्य सावली दिवस येतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे तीन मे रोजी, तर धुळे जिल्ह्यात ३१ मे रोजी शून्य सावली दिवस अनुभवता येतो. भारतात शेवटी मध्यप्रदेशातील भोपाळ जवळून २३.५० अंशावरून कर्कवृत गेले आहे. त्यामुळे शून्य सावलीचा हा शेवटचा भूभाग आहे. 

भारतात २३.५० अंशाच्या पुढे दिल्ली, हिमाचल, काश्मीर कुठेही शून्य सावली घडत नाही. महाराष्ट्रात मे जुलै अशा दोन्ही महिन्यात असा अनुभव पाहायला मिळतो. मे महिन्यात उन्हाळा असल्यामुळे हा अनुभव घेता येतो, मात्र, जुलैमध्ये पावसाळ्यातील ढगाळ वातावरणामुळे हा अनुभवता येत नाही. 

महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात १५.६ अक्षांश ते धुळे जिल्यात २१.९८ अक्षांश या दरम्यान शून्य सावली दिवस पाहता येणार आहे. महाराष्ट्रातील सर्व शहरे आणि गावांच्या वेळात काही सेकंदांचा फरक आहे. त्यामुळे दुपारी १२.१५ ते १२.३० या वेळा दरम्यान सूर्य निरीक्षण करावे. एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी म्हटले आहे. 

३ मे - सावंतवाडी, बेळगाव 
४ मे - मालवण 
५ मे - देवगड, राधानगरी, मुधोळ 
६ मे - कोल्हापूर, इचलकरंजी 
७ मे - रत्नागिरी, सांगली, मिरज 
८ मे - जयगड, कराड 
९ मे - चिपळूण, अक्कलकोट 
१० मे - सातारा, पंढरपूर, सोलापूर 
११ मे - महाबळेश्वर, फलटण, तुळजापूर 
१२ मे - माणगाव, बारामती, बार्शी, उस्मानाबाद, औसा 
१३ मे - मुळशी, पुणे, दौंड, लातूर 
१४ मे - अलिबाग, लोणावळा, तळेगाव दाभाडे, पिंपरी चिंचवड, जामखेड, अंबाजोगाई 
१५ मे - मुंबई, नवी मुंबई, कर्जत, माथेरान, राजगुरुनगर, बीड, गंगाखेड 
१६ मे - बोरीवली, ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, खोडद, अहमदनगर, परभणी 
१७ मे - नाला सोपारा, विरार, आसनगाव, बसमत 
१८ मे - पालघर, कसारा, संगमनेर, श्रीरामपूर, अंबड, हिंगोली 
१९ मे - डहाणू, नाशिक, कोपरगाव, वैजापूर, औरंगाबाद, जालना, पुसद 
२० मे - तलासरी, मेहेकर, वाशीम, वणी, चंद्रपूर, मूळ 
२१ मे - मनमाड, कन्नड,चिखली 
२२ मे - मालेगाव, चाळीसगाव, बुलढाणा, यवतमाळ, आरमोरी 
२३ मे - खामगाव, अकोला, वर्धा 
२४ मे - धुळे, जामनेर, शेगाव, निम्बोरा, उमरेड 
२५ मे - साक्री, अमळनेर, जळगाव, भुसावळ, अमरावती 
२६ मे - चोपडा, परतवाडा, नागपूर 
२७ मे - नंदुरबार, शिरपूर, गोंदिया 
२८ मे - शहादा, पांढुरणा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com