योगींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन; अंबडमध्ये कॉंग्रेस कार्यकर्ते संतापले.

बाबासाहेब गोंटे
Friday, 2 October 2020

  • शेतकरी, कामगार विरोधी बिल रद्द करा, अंबड काँग्रेसची मागणी.  
  • हाथरस घटनेचा निषेध करून मुख्यमंत्री योगीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे केले दहन. 

अबंड (जि.जालना) : हाथरस येथील निर्भया प्रकरणात युपी सरकार पिडीतेच्या कुटुंबिंयावर दबाव आणत आहे. राहुल गांधी यांनी कुटुंबियाची भेट घेण्यासाठी प्रयत्न केला तर पोलिसांनी त्यांना मारहाण केली. या विरोधात देशभर पडसाद उमटू लागले आहे. अंबड कॉग्रेस कमिटीच्या वतीने उत्तर प्रदेश सरकारचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन संताप व्यक्त करण्यात आला आहे,

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अंबड तहसील कार्यालयाच्या आवारात शेतकरी व कामगारांच्या मुळावर असलेले शेतकरी व कामगार विरोधी बिल रद्द करा, अशी मागणी अंबड कॉग्रेसच्या वतीने करण्यात आली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

बुधवारी उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील पीडित मयत कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेले अखिल भारतीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना यूपी सरकारच्या पोलिसांनी धक्काबुक्की करत रस्ता अडविल्याने यूपीए सरकारच्या पोलिसांचा जाहीर निषेध नोंदवत अंबडचे तहसीलदार विद्याचरण कडवकर यांना काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी अखिल भारतीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विठ्ठलसिंग राजपुत यांच्यासह केदार कुलकर्णी, मुस्ताक शेख,अकबर शेख,कैलास राठोड, खुर्शिद जिलानी, शकील शेख, जाकेर डावरगावकर, अविनाश वडगावकर, प्रकाश नारायणकर यांनी निषेध नोंदवून तहसीलदार विद्याचरण कडवकर यांना निवेदन दिले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यावेळी वैजिनाथ डोगंरे, दीपक लोहकरे, बाबासाहेब घोलप, सलमान बागवान, रविंद्र डोंगरे, प्रल्हाद उगले, हुजेर काझी,नवाज पटेल,हरिभाऊ गोडसे,हमीद शेख,मोहसीन हाश्मी, अर्जुन जाधव ,गुलाब राठोड,आत्माराम राठोड,साईनाथ वाघमारे,सोनाजी जाधव ,ज्ञानेश्वर माने,दिलीप  जाधव, प्रशांत घुगे, विजय मुंडे, विष्णू गायकवाड ,  भाईपाशा सादीक, भागवत  काळे ,नारायण वाघमारे,अब्दुल शेख प्रकाश जाधव ,साहेबराव  चव्हाण, सावरगावकर ,चंद्रभान जाधव, राहुल कारके, संदीप जोगदंड यांची उपस्थिती होती.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ambad Congress Committee agitation in Hathras case