Maratha Reservation : सभेला जाणाऱ्यांसाठी जेवण, नाश्ता, पाणी अन् मुक्कामाची देखील सोय

अंतरवाली सराटीत उद्या सभा ः मराठा क्रांती मोर्चातर्फे राष्ट्रीय महामार्गावर नियोजन
antarwali sarathi meeting maratha reservation manoj jarange patil food stay all arrangements beed politics
antarwali sarathi meeting maratha reservation manoj jarange patil food stay all arrangements beed politicsSakal

Beed News : अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण सभा होत आहे. त्यानिमित्ताने मराठा क्रांती मोर्चा बीडच्या वतीने बुधवारी समाजाची बैठक घेवून धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गात करावयाच्या मदतीबाबत नियोजन करण्यात आले आहे. रस्त्यात जेवण, नाश्ता, पाणी आणि बीडमध्ये मुक्कामी येणाऱ्यासाठी सोय करण्यात आली आहे.

सोलापूर ते छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी जेवन, नाष्टा, वैद्यकीय सेवा, गाडी पंचर झाल्यास मेकॅनिकची सुविधा, एक रुपया दराने स्वस्त डिझेल आणि पेट्रोल, मराठा बांधव आणि भगिनींची मुक्कामाची सोय करण्यात आलेली आहे.

चिवड्याचे पार्सल पाकीटची व्यवस्था केली असून ठिकठिकाणी फळे, पिण्याचे पाणी व सभेसाठी जाणाऱ्या बांधवांस आणि भगिनींना कोणतीही अडचण येणार नाही, यासाठी आपत्कालीन सेवा उपलब्ध करून दिली आहे.

antarwali sarathi meeting maratha reservation manoj jarange patil food stay all arrangements beed politics
Beed : गुप्तधनाच्या पूजेला विरोध; महिलेवर अनैसर्गिक अत्याचार; पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्हा
Food
Food sakal

प्रामुख्याने चौसाळा येथे नाश्ता, पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पाली ग्रामस्थांनी आहेर वडगाव फाटा येथे नाश्ता, पाणी व चहाची व्यवस्था केलेली आहे. बीड शहरात महालक्ष्मी चौक येथे चहा, नाष्टा, सरबत, फळे यांची सोय करण्यात आलेली आहे.

नामलगाव फाटा येथे खांडे पारगाव ग्रामस्थांच्या वतीने भोजनाची व्यवस्था केली आहे. बीड येथील रामकृष्ण लॉन्स येथे मराठा बांधवांच्या १३ व १४ तारखेच्या मुक्कामाची तसेच नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. (Maratha Reservation)

antarwali sarathi meeting maratha reservation manoj jarange patil food stay all arrangements beed politics
Beed News : सेलूत ज्ञानराधा बँकेत ठेविदारांची गर्दी; श्री. कुटे अडचणीत येतील का?

तसेच ठीक ठिकाणी रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. बीड जिल्हा मराठा क्रांती मोर्चाचे स्वयंसेवक चौसाळ्यापासून ते शहागडपर्यंत ठिकठिकाणी मराठा बांधवांच्या मदतीसाठी उपलब्ध करण्यात आलेले आहेत.

गेवराई परिसरात सुविधा

गढी येथे तुळजाभवानी मंदिरासमोर शिवछत्र परिवाराच्या वतीने १३ व १४ रोजी निवास, जेवन व नाश्त्याची व्यवस्था केली असून गेवराई बायपास रोडवर दत्तकृपा हॉटेल येथे नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. दरम्यान, जेवन आणि नाश्त्याच्या प्रत्येक ठिकाणी बीड जिल्हा रुग्णालयाच्या वतीने वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com