औरंगाबादः घाटीत कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरूच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

रुग्णसेवा विस्कळीत  : रुग्णालयाच्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर

औरंगाबाद: शासकीय वैद्यकीय महाविद्याल व रुग्णालयाच्या (घाटी) राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या कामबंद आंदोलनाचा संप सलग दुसऱ्या दिवशीही शुक्रवारी (ता. 22) सुरु आहे. त्यामुळे रुग्णालयातील साफसफाई, प्रसूती, सर्जरी विभागातील बायोवेस्टच्या सफाईची कामे थांबली आहेत. 29 दिवसांच्या हंगामी चाळीस कर्मचारी आणि स्वयंसेवकांच्या मदतीने घाटी प्रशासन कामकाज सुरळीत करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यात नातेवाईकचाही हातभार लागत असल्याचे चित्र घाटीत दिसत आहे.

गरीब रुग्णांचा आधार असलेल्या घाटीच्या रुग्णालयात दररोज दीड ते दोन हजार रुग्ण बाह्यरुग्ण विभागात दाखल होतात. या विभागातील कामकाज सुरळीत सुरु असून प्रसूती, सर्जरी, अस्तिव्यंगोपचार विभागातील कामकाज काही प्रमाणात प्रभाती झाले आहे. तर या विभागातील नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सिझेरियन वार्ड, बालरोग विभागातील ऑक्सिजन सिस्टीम मॅन्युअली असल्यामुळे ऑक्सिजनचे जम्बो सिलेंडर पोहचवणे, स्वयंपाक घरातील कामांसाठी स्वयंसेवक मदत करीत आहे. स्वयंसेवकांना रोखण्याचे कामही संघटनेकडून होत आहे. त्यामुळे वाद होऊ नये म्हणून प्रशासनाने स्वयंसेवकांना दुपारी बारा वाजेनंतर काही काळ थांबण्याच्या सूचना केल्या आहेत.

संपकाऱ्यांची घोषणाबाजी
बोल मेरे भैय्या... हल्ला बोल....कुशासन पे...हल्ला बोल..राजनीती पे.... हल्ला बोल... अशा घोषणा देत राज्य शासन संघटनेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असून कर्मचाऱ्यांना न्याय द्या अशी भावना घोषणांमधून व्यक्त केली. अधिक्षक कार्यालयासमोर गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.  या संपात घाटीत कार्यरत चार पैकी तीन कर्मचारी संघटना सहभागी नसल्याने प्रशासनहि या संपकरी संघटनेकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र आहे. तर दुसऱ्या शिफ्ट नंतर कामकाज सुरळीत होईल असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: aurangabad news ghati hospital employees sencond day strike