माजलगावात साडीचे दुकान फोडले; सात लाखांची चोरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

शहरातील शिवाजी चौकामध्ये कमलकिशोर लड्डा यांचे पुनम साडी सेंटर आहे. आज खरेदीसाठी जाणार असल्याने पावणे दोन लाख रुपये जमा करून दुकानात ठेवले होते. अज्ञात चोरट्याने सदरील रक्कम व पाच लाख रुपये किमतीच्या साड्या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करून पळवल्याची घटना आज पहाटे घडली.

माजलगाव : शहरामध्ये चोरट्याने धुमाकूळ घातला असून आज (बुधवार) पहाटे पुनम साडी सेंटरमधून 5 लाख रुपये किमतीच्या साड्या व नगदी पावणे दोन लाख रुपये रोख असा ऐवज लुटून दरोडा टाकल्याची घटना घडली असून तीन दिवसात चोरीची ही तिसरी घटना असल्याने शहरातील नागरिक धास्तावले आहेत. पोलिस यंत्रणेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील शिवाजी चौकामध्ये कमलकिशोर लड्डा यांचे पुनम साडी सेंटर आहे. आज खरेदीसाठी जाणार असल्याने पावणे दोन लाख रुपये जमा करून दुकानात ठेवले होते. अज्ञात चोरट्याने सदरील रक्कम व पाच लाख रुपये किमतीच्या साड्या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करून पळवल्याची घटना आज पहाटे घडली.

दरम्यान सलग तिसऱ्या दिवशीही चोरी सत्र सुरू असून पोलिस यंत्रणेच्या सुरक्षिततेविषयी प्रश्न चिन्ह निर्माण झाला असल्याने नागरिक धास्तावले आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: Beed news decoit in Majalgaon

टॅग्स