esakal | राज्य शासनाचा निर्णय : कोरोना योद्ध्यांना खास स्वातंत्र्य दिनाचे निमंत्रण
sakal

बोलून बातमी शोधा

corona worriers.jpg


सध्या कोरोनाचे सावट आहे. पण या कोरोना विरुद्धच्या लढाईत अग्रेसर असलेल्या कोरोना योद्धे आणि कोरोनावर मात केलेल्या काही नागरीकांना राज्यातील शासकीय ध्वजवंदनाच्या कार्यक्रमात खास निमंत्रित केले जाणार आहे. तसे आदेशही शासनाने दिले आहेत.

राज्य शासनाचा निर्णय : कोरोना योद्ध्यांना खास स्वातंत्र्य दिनाचे निमंत्रण

sakal_logo
By
हरी तुगावकर

लातूर : राज्यात शासकीय पातळीवर आता स्वातंत्र्य दिनाची तयारी सुरु झाली आहे. कोरोनामुळे महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी मोठ्या मर्यादा आल्या होत्या. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा दिन साजरा झाला होता. पण सध्या अनलॉक प्रक्रिया सुरु झाली आहे. स्वातंत्र्य दिनावर देखील काही मर्यादा असल्या तरी हा दिवस उत्साहात साजरा केला जाणार आहे.

लाखोंचे पॅकेज नाकारुन अंकिताने देशसेवेसाठी ‘यूपीएससी’त मिळविले यश  

सध्या कोरोनाचे सावट आहे. पण या कोरोना विरुद्धच्या लढाईत अग्रेसर असलेल्या कोरोना योद्धे आणि कोरोनावर मात केलेल्या काही नागरीकांना राज्यातील शासकीय ध्वजवंदनाच्या कार्यक्रमात खास निमंत्रित केले जाणार आहे. तसे आदेशही शासनाने दिले आहेत.

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७३ वा वर्धापन दिन शनिवारी (ता. १५) साजरा होत आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाची पार्श्वभूमी विचारात घेता दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम आयोजित करण्यावर मर्यादा आहेत. ही वस्तुस्थिती व सावधगिरीच्या उपाय योजना विचारात घेता शासनाने या संदर्भात हा दिन कसा साजरा करावा याचे आदेशही दिले आहेत. मुख्य शासकीय कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नींना व आई वडिलांना निमंत्रीत करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. 

पण यावेळेला कोरोना विरुद्धच्या युद्धात अग्रेसर राहून कोरोना योद्धा म्हणून भूमिका पार पाडत असलेल्या डॉक्टर्स, सफाई कामगार, आरोग्य सेवकांना निमंत्रित करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तसेच कोरोनावर मात करणाऱया काही नागरीकांना देखील या कार्यक्रमाला बोलवण्याचे आदेशही शासनाने दिले आहेत. अशा लोकांचा एक प्रकारे हा सन्मानच असणार आहे.

वडिलांचा त्याग, आईची तगमग...औरंगाबादच्या नेहाने साकारले युपीएससीत यश

सामाजिक अंतर पाळणे, मास्क बांधणे अशा उपाय योजना करूनच हे कार्यक्रम होणार आहेत. नागरीकांना घरबसल्या हा सोहळा पाहता यावा या करीता वेबसाईटद्वारे त्याचे थेट प्रक्षेपण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन असणार आहे.

औरंगाबाद : पाच वेळा हरला, पुन्हा जिद्दीने उभा राहिला..अन् विस्तार अधिकाऱ्याचा पोऱ्या कलेक्टर झाला... 

यात वृक्षारोपन, आंतर शालेय, आंतर महाविद्यालयी ऑनलाईऩ पद्धतीने वाद विवाद स्पर्धा, प्रश्नमंजुषा, देशभक्तीपर निबंध व कविता स्पर्धेचे आयोजन, सोशल मीडिआद्वारे निवडक विद्यार्थी व विद्यार्थीनीचे देशभक्तीपर गाणे किंवा भाषणे आयोजित करणे, शासकीय इमारतीवर विद्यात रोषणाई करणे, एखाद्या विषयाचा वेबिनार घेणे, एनएसएस व एनवायकेएसद्वारे देशभक्तीपर ऑनलाईन मोहिम राबवणे, सोशल मीडिआ व डिजीटल माध्यमाद्वारे देशभक्तीपर किंवा राष्ट्रीय एकात्मते संबंधातील गाण्याचा प्रचार करावा असेही आदेश देण्यात आले आहेत.

महापालिकेची ही शाळा आहे खासगीच्या तोडीस तोड  

तसेच विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱय़ांनी आपआपल्या अधिकारक्षेत्रात कोरोना विषाणु संसर्गाची व्याप्ती विचारात घेवून स्वातंत्र्य दिनाचे महत्व लक्षात घेता साजेसा समारंभ साजरा करावा. या करीता पालकमंत्र्यांच्या सहमतीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेशही शासनाने दिले आहेत.

(संपादन-प्रताप अवचार)