BAMU Namvistar Din : बाळासाहेब ठाकरेंचा मराठवाडा विद्यापीठ नामांतरला का होता विरोध? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BAMU Namvistar Din

BAMU Namvistar Din : बाळासाहेब ठाकरेंचा मराठवाडा विद्यापीठ नामांतरला का होता विरोध?

BAMU Namvistar Din : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आज नामविस्तार दिवस आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला देण्यासाठी 17 वर्षे आंदोलन केल्यानंतर अखेर आजच्याच दिवशी 1994 साली नामांतर झाले. हा दिवस नामविस्तार दिवस म्हणून साजरा केला जातो.

पण तुम्हाला माहिती आहे का, मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारे हिंदूह्रदय बाळासाहेब ठाकरे यांचा मात्र या नामांतराला विरोध होता. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. (dr babasaheb ambedkar marathwada university namvistar din )

मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी १७ वर्ष आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे या नामांतराला बाळासाहेब ठाकरे यांचा विरोध होता.

1994 रोजी नांदेडच्या एका जाहीर सभेत बोलताना बाळासाहेबांनी ‘भाकरीचे पीठही ज्यांना मिळत नाही त्यांना विद्यापीठ कशाला?’ असं वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्याने एका नव्या वादाला तोडं फुटले कारण मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणाऱ्या बाळासाहेबांकडून हे वक्तव्य कुणालाच अपेक्षित नव्हतं. मात्र त्यांची भूमिका स्पष्ट होती.

हेही वाचा: Balasaheb Thackrey : ठाकरे गटाच्या आमदारांची नाराजी म्हणाले, बाळासाहेबाचे चित्र...

त्यांच्या मते, रझाकाराच्या भयानक अत्याचाराविरोधात मराठवाड्यातील जनता जीवाची पर्वा न करता लढली. आणि मराठवाडा या शब्दातच मराठी माणसाचे नाते आहे. आपला इतिहास या नावात आहे मग मराठवाड्याचे नाव घालवून आंबेडकरांच्या नावाचा अट्टहास कशासाठी? मात्र त्यांच्या या भूमिकेवर सर्व स्तरातून टिका करण्यात आली.

हेही वाचा: Pune University : आता विद्यार्थ्यांची नव्हे, विद्यापीठाचीच ‘परीक्षा’

जेव्हा शरद पवारांनी नामांतराची घोषणा केली तेव्हा बाळासाहेब चांगलेच तापले होते. याचा निषेध म्हणून त्यांनी औरंगाबादला जाहीर सभा आयोजित केली. मात्र या सभेला जाण्यासाठी पोलिसांनी त्यांना पुण्यातच थांबविले आणि माघारी पाठविले.

पुढे एका परभणीच्या जाहीर सभेत या घटनेविषयी बोलताना बाळासाहेबांनी  सांगितले होते की त्यांना पुण्याजवळ अडवले होते. पोलिस तेव्हा त्यांना अटक करू शकत होते मात्र पोलिस त्यावेळी म्हणाले होते, "साहेब, तुम्ही अटक करून घेतली तर महाराष्‍ट्र पेटेल." म्हणून सर्वांच्या हिताचा विचार करून माघारी गेल्याचे बाळासाहेब म्हणाले होते.

हेही वाचा: Marathwada : औंढा तालुक्यातील चार ग्रामपंचायतींवर महिलाराज

त्यानंतर पुढे शरद पवारांनी तोडगा काढत औरंगाबाद विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नाव देत नामविस्तार केला.

 पुढे 2011 मध्ये बाळासाहेब ठाकरे नामांतराच्या विषयावर बोलताना म्हणाले होते की माझा कधीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावास विरोध नव्हता. मराठवाड्याचा इतिहास पुसला जाऊ नये ही एकच भावना माझ्या मनात होती.