देवणी गोवंश जतन करण्यासाठी आता बारामती पॅटर्न : आ धीरज देशमुखांचा पुढाकार

हरी तुगावकर
Monday, 7 December 2020

देवणी गोवंशाची संख्या कमी होत आहे. हे चित्र बदलण्यासाठी व देवणी गोवंशाचे जतन होण्यासाठी बारामती येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र आणि ‘सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर जेनेटिक्स इंप्रूव्हमेंट ऑफ डेअरी ऍनिमल्स’ या संस्थांकडून मदतीचा हात मिळणार आहे. यासाठी आमदार धीरज देशमुख यांनी पुढाकार घेतला असून, संस्थेचे विश्वस्त रणजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 

लातूर : देवणी गोवंशाची संख्या कमी होत आहे. हे चित्र बदलण्यासाठी व देवणी गोवंशाचे जतन होण्यासाठी बारामती येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र आणि ‘सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर जेनेटिक्स इंप्रूव्हमेंट ऑफ डेअरी ऍनिमल्स’ या संस्थांकडून मदतीचा हात मिळणार आहे. यासाठी आमदार धीरज देशमुख यांनी पुढाकार घेतला असून, संस्थेचे विश्वस्त रणजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 

शेतकऱ्यांच्या मानगुटीवर ‘आरटीओ’चे भूत, ओव्हरलोडिंगच्या नावाखाली लूट

 

बारामती येथे ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र आणि ‘सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर जेनेटिक्स इंप्रूव्हमेंट ऑफ डेअरी ऍनिमल्स’ या बहुपयोगी प्रकल्प आहे. शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणापासून दुधाळ गायी-म्हशीच्या चांगल्या वंशावळीच्या संगोपनापर्यंतची विविध स्तरावरील कामे एकाच छताखाली येथे चालतात. शेतकऱ्यांचे हित केंद्रस्थानी ठेवून ज्येष्ठ नेते शरद पवार नेहमीच आपल्या दूरदृष्टिकोनातून निरनिराळे प्रयोग राबवत असतात. त्यापैकीच हा एक प्रकल्प आहे. या प्रकल्पाला आमदार देशमुख यांनी भेट दिली. 

बिबट्या सापडेना, शोधमोहीम गुंडाळण्याची तयारी; पंधरा दिवसांच्या मोहिमेत हाती काहीच नाही

 

सध्या देवणी गोवंशाची संख्या कमी होत चालली आहे. या विषयावर श्री. देशमुख आणि विश्वस्त रणजित पवार यांच्यात चर्चा झाली. देवणी गोवंशाचे जतन करण्याबरोबरच शेतकरी प्रशिक्षण, संशोधन, अभ्यास, खाद्य व्यवस्थापन, रोगनिदान अशा विविध स्तरावर सहकार्य केले जाईल, असा शब्द रणजित पवार यांनी यावेळी दिला. दरम्यान, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र आणि ‘सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर जेनेटिक्स इंप्रूव्हमेंट ऑफ डेअरी ऍनिमल्स’ यांच्या विविधस्तरावरील सहकार्यामुळे आपल्या भागातील शेतकरी, विद्यार्थी, अभ्यासक यांना फायदा होईल. शिवाय, लातूरची देवणी अशी ओळख राज्यात आणि राज्याबाहेर तयार होण्यास, दूध उत्पादन क्षेत्रात लातूर आणखी पुढे जाण्यास मदत होईल, असा विश्वास आमदार देशमुख यांनी व्यक्त केला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Efforts to save Devani Govansh MLA Dheeraj Deshmukh initiative