esakal | अतिवृष्टीचा ग्रामबिजोप्तादनाला बसणार फटका ! 
sakal

बोलून बातमी शोधा

soyabin.jpg

लातूर जिल्ह्यातील चित्र; सोयाबीनचे मोठे नुकसान

अतिवृष्टीचा ग्रामबिजोप्तादनाला बसणार फटका ! 

sakal_logo
By
हरी तुगावकर

लातूर :  या वर्षी सुरुवातीपासून चांगला पाऊस होत गेल्याने सोयाबीनचे पीक जोमदार आले होते. पण ऐन काढणीच्या वेळी जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. याचा मोठा फटका सोयाबीनला बसला आहे. सततच्या पावसामुळे किडीचा प्रादूर्भाव आणि उभ्या पिकालाच शेंगा फुटण्याचे प्रकार झाले. यात सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पुढील वर्षीसाठीच्या ग्रामबिजोत्पादनाला मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे शेतकरय़ांनी आतापासूनच नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

लातूर जिल्हा सोयाबीनमध्ये अग्रेसर आहे. या वर्षी जूनच्या सुरवातीपासूनच जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. त्याचा परिणाम जिल्ह्यात
सोयाबीनचे सरासरी क्षेत्र तीन लाख ९१ हजार २९२ हेक्टर असताना प्रत्यक्ष पेरणी मात्र ४ लाख ५९ हजार ९७६ हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. ११८ टक्के ही पेरणी आहे. सुरवतीच्या काळात महाबीजसह इतर कंपन्यांच्या बियाणेच उगवल्या नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या. याचा मोठा फटकाही शेतकऱयांना बसला. काही भागात दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱयांवर आली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सप्टेंबरमध्ये सोयाबीन काढणीला येते. यावर्षी पाऊस चांगला राहिल्याने सोयाबीन पिकही दमदार आले होते. उतारा चांगला येईल असे शेतकऱयाना वाटत असतानाच सप्टेंबर महिन्यात सततचा पाऊस आणि अतिवृष्टीचा फटका या पिकाला बसला आहे. याचे पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. प्राथमिक अंदाजानुसार एक लाख हेक्टरवरील क्षेत्राचे नुकसान झाले आहे. हे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या ठिकाणचे क्षेत्र आहे. ३३ टक्के पेक्षा कमी झालेले क्षेत्रही मोठे आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीनवर किड, आळ्यापडून नुकसान झाले. तर अनेक ठिकाणी उभ्या पिकाला कोंब फुटल्याने फटका बसला आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आता कृषी विभागाने पुढील वर्षासाठी ग्रामबिजोत्पादनाचे नियोजन सुरु केले आहे. तीन लाख ३७ हजार क्विंटल बियाणे उत्पादनाचा इष्टांक ठेवण्यात आला आहे. पण हे नियोजन कागदोपत्रीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी चांगले पिक आले आहे तेथे शेतकऱयांनी पुढच्या वर्षीसाठी बियाणे जतन करुन ठेवण्याची गरज आहे. अन्यथा सोयाबीनच्या बियाणांचा तुटवडा जाणवणार आहे.


लातूर जिल्ह्यात खरीप हंगाम २०२१ साठी कृषी विभागाने घरचे सोयाबीन बियाणे जतन करण्याचे केलेले नियोजन

तालुका    नियोजितक्षेत्र  शे.सख्या   क्षेत्रइष्टांक  बियाणे उत्पादन इष्टांक 
लातूर         ७०३१९           ९०८                  ३०३               ०७६३
उदगीर      ४२२०७            २३४                  १५३५            २०७०६
अहमदपूर     ३८८४९         १२८६                ३१२३             ५२४६७
जळकोट     १८८३५           ६०८                  १७४०             २४७९९
देवणी-      २५९८७             १६०                १२२८              १४५६४
शिरुर अनंतपाळ- २३८२५    १४३                 १२६८             १५३५४
औसा           ७७९२४          ८७२                २२९२              ३५८४२
निलंगा          ६९८०७          ८१९                २२१६              ३४३१९
रेणापूर          ४४९११           १०७४               ३११०              ५२१९२
चाकूर         ४६६१२            ६११               २३३०                ३६५९९
-------------------------------------------------------------------------------
एकूण-     ४५९२७६        ६८९३               २१८८०               ३३७६०५

(संपादन-प्रताप अवचार)