लातूर : रूग्णालयातील खाटांची उपलब्धता आता संकेतस्थळावर

हरी तुगावकर
Wednesday, 22 July 2020

जिल्हा शल्यचिकित्सकांनी https://covid१९bedinfo.cslatur.in/ या नावाने संकेतस्थळ विकसित केले आहे. या संकेतस्थळावर गेल्यानंतर Real-Time Hospital Bed Availability पर्यायाला क्लिक केल्यानंतर जिल्ह्यातील सर्व रुग्णालयाची माहिती उपलब्ध होते. कोणत्या रुग्णालयामध्ये सध्या किती रुग्ण उपचार घेत असून किती खाटा शिल्लक आहेत हेही लक्षात येते. त्यामुळे रुग्णाला सोयीच्या रुग्णालयामध्ये तातडीने उपचार मिळण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरणार आहे.

लातूर : कोवीड-१९ साथीच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयात खाटाची उपलब्धता लक्षात येण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या संकेत स्थळावर ‘डॅश बोर्ड’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शासकीय योजनांचा लाभ कोणत्या रुग्णालयात मिळू शकतो याचा तपशीलही त्याठिकाणी देण्यात आला आहे. पालकमंत्री अमित देशमुख यांच्या सूचनेवरून जिल्ह्यातील नागरीकांसाठी ही सुविधा देण्यात आली आहे.

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   

कोवीड-१९ प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जनतेची गैरसोय टाळण्यासाठी कोवीड आणि नॉन कोविड रुग्णावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांची माहीती एकत्र उपलब्ध करावी, कोणत्या रुग्णालयात सध्या किती खाटा शिल्लक आहेत. शासकीय योजनांसाठी कोणती रुग्णालय पात्र आहेत याचा तपशील जनतेसाठी खुला करावा अशी सूचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हा आढावा बैठकीत केली होती.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

या सूचनेनुसार जिल्हा शल्यचिकित्सकांनी https://covid१९bedinfo.cslatur.in/ या नावाने संकेतस्थळ विकसित केले आहे. या संकेतस्थळावर गेल्यानंतर Real-Time Hospital Bed Availability पर्यायाला क्लिक केल्यानंतर जिल्ह्यातील सर्व रुग्णालयाची माहिती उपलब्ध होते. कोणत्या रुग्णालयामध्ये सध्या किती रुग्ण उपचार घेत असून किती खाटा शिल्लक आहेत हेही लक्षात येते. त्यामुळे रुग्णाला सोयीच्या रुग्णालयामध्ये तातडीने उपचार मिळण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरणार आहे.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

जिल्हयात शासकीय आणि खासगी रुग्णालयात एकूण ४१४ रुग्णालय असून या सर्व रुग्णालयामध्ये सर्वसाधारण उपचाराचे एकूण सात ६५६ तर आयसीयू ३४६ खाटा उपलब्ध आहेत. या सर्व रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयाची दररोजची माहिती अद्ययावत ठेवण्याची सूचना श्री. देशमुख यांनी केली आहे.

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयाबरोबरच, अनेक खासगी रुग्णालयात (ता.१ एप्रिल २०२०) पासून महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व पंतप्रधान जनआरोग्य योजना एकत्रितपणे राबविण्यात येणार आहे. या रुग्णालयाची माहितीही या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संकेतस्थळावर उपलब्ध about हा पर्याय क्लिक केल्यावर या योजनेचा लाभ मिळणाऱ्या रुग्णालयाची माहिती उपलब्ध होते. या योजनेच्या लाभासंदर्भात अगोदर माहिती घेऊनच रूग्णालयात दाखल झाल्यास रुग्णांचा मनस्ताप कमी होणार आहे. शिवाय आर्थिक अडचणी निर्माण होणार नाहीत, त्यामुळे अशा रुग्णांनी माहिती घेऊनच दाखल व्हावे असे आवाहन पालकमंत्री देशमुख यांनी केले आहे.

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 

रुग्ण कोवीड १९ पॉझिटीव्ह असो की नॉन पॉझिटीव्ह त्यांनी रुग्णालयात जाताना रेशनकार्ड आणि ओळखपत्र सोबत ठेवावे. रूग्णालयात खर्चासाठी शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी ही कागदपत्र अनिवार्य असल्याने नंतर रुग्णाची धावपळ होणार नाही. याशिवाय रुग्ण कोवीड-१९ पॉझिटिव्ह आल्यास त्याच्या कुटुंबाची तपासणी करून त्यांना सुरक्षित करण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरणारी आहे. याची रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी नोंद घ्यावी असे आवाहन श्री. देशमुख यांनी केले आहे.

(संपादन : प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hospital beds are now available on the website