पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांना `विश्व संगीत कलारत्न` पुरस्कार 

mangeshkar.jpg
mangeshkar.jpg

लातूर :  येथील मराठवाडा संगीत कला अकादमीच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येणारा लोकनेते विलासराव देशमुख स्मृती `विश्व संगीत कलारत्न` पुरस्कारासाठी ज्येष्ठ संगीतकार पद्मश्री पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांना जाहिर करण्यात आला आहे. हा पुरस्कार पुढील काळात जाहीर समारंभात त्यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती अकादमीचे अध्यक्ष तालमणी डॉ. राम बोरगांवकर यांनी येथे दिली.

या पुरस्काराचे स्वरुप ५१ हजार रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह असे आहे. हा पुरस्कार मी अत्यंत आनंदाने स्वीकारत आहे, असे श्री. मंगेशकर यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. हा पुरस्कार स्विकारण्यासाठी मी लातूरला रसिकांच्या भेटीला नक्की येईन असे ते म्हणाल्याचे डॉ. राम बोरगांवकर यांनी सांगितले. पं. विकास कशाळकर, पं. नाथराव नेरळकर व डॉ. राम बोरगांवकर या त्रिस्तरीय समितीने श्री. मंगेशकर यांची या पुरस्कारासाठी एकमताने निवड केली.

विश्वात भारत मातेला संगीत कलेचा अजोड वारसा देणाऱया मंगेशकर कुटुंबियातील पं. ह्रदयनाथ मंगेशकर हे अतिशय प्रतिभावान अष्टपैलू संगीतकार आहेत़. त्यांनी `संतवाणीला` दिलेले संगीत लतादीदींच्या स्वरातून अजरामर झालेले आहे. `जैत रे जैत`, `चानी`, `निवडुंग`, `उंबरठा` या मराठी तसेच `धनवान`, `सुबह`, `मशाल`, `लेकिन` यासारख्या अनेक चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले आहे. त्यांनी दिलेले संगीत अजरामर असून संगीत रसिक ते कधीही विसरू शकणार नाहीत. यामुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

संपादन-प्रताप अवचार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com