विधवा सूनेचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, सून आणि प्रियकराला ट्रॅक्टरखाली चिरडलं

बाबासाहेब गोंटे 
Friday, 30 October 2020

अंबड तालुक्यतील चापडगाव येथे अनैतिक संबंधातून दोघांना ट्रॅक्टरच्या खाली चिरडून मारण्याची घटना बुधवारी (28) साडे दहा ते अकरा वाजेच्या सुमारास राणी ऊंचेगाव चापडगाव शेतशिवारात घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी दोघांविरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली आहे. जीवे मारणारे हे विधवा महिलेचे सासरे व दीर असून या घटनेने संपुर्ण जालना जिल्हा हादरला आहे. 

अंबड (जालना) : विधवा सुनेच्या अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन सासऱ्याने मुलाच्या हातून सून आणि तिच्या प्रियकराला ट्रॅक्टरखाली चिरडून टाकल्याची घटना जालना जिल्ह्यात घडली. अंबड तालुक्यातील चापडगाव शिवारात ही घटना घडली असल्याचे समोर आले आहे. भागवत प्रल्हाद हरबक आणि मारिया विनोद लालझरे अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भागवत हरबक हा एका संघटनेचा चापडगावचा अध्यक्ष होता. त्या संघटनेचा बुधवारी (ता.28) तालूक्यातील कुंभार पिंपळगावला मेळावा होता. त्यामुळे भागवत आणि मारिया हे दोघे दुचाकीवर मेळाव्याला गेले. पण तास दीड तासानंतर भागवतच्या दुचाकीचा अपघात झाला अशी बातमी कुटुंबियांना समजली. जखमी अवस्थेत भागवतला रुग्णालयात घेऊन जाताना त्याने आईला सांगितले की, विकास बथवेल लालझरे याने मुद्दामहून आमच्या अंगावर ट्रॅक्टर घातला आहे. उपचाराअंती भागवत हरबकचा मृत्यू झाला. तर मारियाचा देखील रुग्णालयात नेताना मृत्यू झाला होता. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पोलिसांनी सांगीतले की, मारियाचा पती विनोद लालझरे याने दहा वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. मागील तीन वर्षांपासून भागवत हरबक आणि मारिया लालझरे यांचे प्रेमसंबंध होते. तर मागील सहा महिन्यांपासून दोघेही एकत्र राहत होते. याचा राग मारियाचे सासरे आणि दीर यांना होता. दोघांचे संबंध अनैतिक असल्याचा राग मनात ठेवून मारीयाचे सासरे बथुवेल लालझरे यांच्या सांगण्यावरुन मुलगा विकास बथुवेल लालझरेने आपल्या मालकीच्या ट्रॅक्टरने दुचाकी क्रमांक एम. एच. 21 ए. के. 1977 यावर असलेल्या मारिया आणि भागवत यांना चिरडले. यात दोघांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मृत भागवत हरबक यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरुन मारियाचा सासरा बथुवेल लालझरे आणि मुलगा विकास लालझरे यांच्याविरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. आरोपी विकास लालझरे याला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर हे करत आहे. अशी माहिती ठाणे अंमलदार चव्हाण यांनी दिली. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Immoral relationship of widow daughter-in-law murder of daughter-in-law and lover