लातूरात 'धारावी पॅटर्न' राबवा : वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख 

हरी तुगावकर
Wednesday, 29 July 2020

लातूर शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादूर्भाव वाढतच चाललेला आहे. त्याअनुषंगाने लातूर महापालिकेने हा प्रादूर्भाव रोखण्यासाठी `धारावी मॉडेल` कशा पद्धतीने येथे राबवता येईल यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री व पालकमंत्री अमित देशमुख यांनी महापालिकेला केली आहे. 

लातूर : लातूर शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादूर्भाव वाढतच चाललेला आहे. त्याअनुषंगाने लातूर महापालिकेने हा प्रादूर्भाव रोखण्यासाठी `धारावी मॉडेल` कशा पद्धतीने येथे राबवता येईल यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री व पालकमंत्री अमित देशमुख यांनी महापालिकेला केली आहे.  येथे बुधवारी (ता. २९) आयोजित बैठकीत ते बोलत होते. 

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, महापालिका आयुक्त देविदास टेकाळे, महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती दीपक मठपती, महापालिकेचे विरोधी पक्षनेते दीपक सूळ, परिवहन सभापती मंगेश बिराजदार, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन डोईबोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे, डॉ. गिरीश ठाकूर, महापालिकेचे सहायक आयुक्त वसुधा फड,  सुंदर बोंदर आदी उपस्थित होते.

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 

धारावीमध्ये कोरोनाच्या प्रादूर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या त्या उपाययोजनांची लातूर महापालिका क्षेत्रात अंमलबजावणी करण्याबाबत महापालिकेने प्रयत्न करावेत. याकरिता हॉटस्पॉट ठरत असलेल्या भागातील सर्व लोकांची एकाच दिवशी टेस्ट करणे तसेच त्या लोकांना एखाद्या ठिकाणी शिफ्ट करून चौदा दिवस क्वारंटाईन करणे अशा उपाय योजना राबविण्याबाबत चाचपणी करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

महापालिकेने सर्व १८ प्रभागांमध्ये प्रत्येकी एक स्वॅब कलेक्शन सेंटर निर्माण करावे व त्या ठिकाणी आवश्यक आरोग्य कर्मचारी नेमून त्या प्रभागातील लोकांचे स्वॅब घेण्याची व्यवस्था करावी. त्याप्रमाणेच महापालिकेने चेस दी वायरस या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर मास टेस्टिंग करावी. महापालिकेने प्रभाग निहाय टास्क फोर्सची निर्मिती करावी व या प्रभागाची जबाबदारीसाठी अधिकाऱ्यांच्या टीम तयार कराव्यात. या करीता स्थानिक नगरसेवकांची मदत घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

महापालिकेने किमान एक हजार खाटाची उपलब्ध करणे, सहा अतिरिक्त रुग्णवाहिका उपलब्ध ठेवणे, कंन्टेंमेंट झोनसाठी खासगी सुरक्षा रक्षक नियुक्त करावेत. महापालिकेला मोठ्या प्रमाणावर रॅपिड टेस्ट करण्यासाठी रॅपिड किट्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत. महापालिकेने कोविड केअर सेंटरसाठी एखादे मोठे मंगल कार्यालयाची पाहणी करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

(संपादन-प्रताप अवचार) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Implement Dharavi pattern in Latur Minister Amit Deshmukh