esakal | जालना जिल्ह्यात मिनी लाॅकडाउन; अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

Lock Down In Jalna

मंगळवारी (ता.सहा) पोलिस प्रशासनासह नगरपालिकेने शहरात सकाळी उघडलेल्या आस्थापानाचे शटर खाली केले.

जालना जिल्ह्यात मिनी लाॅकडाउन; अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना : जिल्ह्यात अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले आहेत. त्यामुळे मंगळवारी (ता.सहा) पोलिस प्रशासनासह नगरपालिकेने शहरात सकाळी उघडलेल्या आस्थापानाचे शटर खाली केले. ता.३० एप्रिलपर्यंत आता या सर्व आस्थापना बंद असणार आहेत. दुसरीकडे रात्री संचार, तर दिवसा जमाबंदीचे आदेश आल्याने आता जिल्ह्यात मिनी लॉकडाऊन लागू झाल्याचे चित्र आहे. 

डाॅक्टराकडे मेडिसिनची पदवी नाय! पण कोरोना रुग्णांवर उपचार सुरु, औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापुरात धक्कादायक प्रकार  

हे असणार सूरू
जिल्ह्यातील रूग्णालये, रोगनिदान केंद्र, वैद्यकीय विमा कार्यालये, औषधी दुकाने, औधष निर्मिती उद्योगासह वैद्यकीय व आरोग्य विषयक सेवा, किराणा, भाजीपाली, डेअरी, बेकरी, मिठाई दुकने, फुड शॉप्स, बस, रेल्वे, रिक्षा, स्थानिक प्रशासनाचे मान्सूनपूर्व कामे, सार्वजनिक सेवा, माला वाहतूक, कृषी विषयक सेवा, ई-कॉमर्स, पेट्रोल पंप, सरकारी व खासगी सुरक्षा सेवा, फळ विक्रेते, पायाभूत सुविधा व सेवेशी संबंधित आयटी सेवा बाबी सुरू असतील  असे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आपल्या आदेशात म्हटले आहेत. तर रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी सकाळी सात ते रात्री आठ या दरम्यान पार्सल सुविधा सुरू ठेवावी, असे ही या आदेशात म्हटले आहे. 

'माझ्यावरील कारवाईसाठी मागणी करणारे शिवसेना-भाजपाचे नेते आता कुठे?

पार्सल सुविधा सुरु

तर या अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व आस्थापना, बाजारपेठा, मॉल पूर्णपणे बंद राहणार आहे. जिल्ह्यातील चित्रपटगृह, नाट्यगृहे, पार्क, जलतरण तलाव, जीम, क्रीडा संकूल हे बंद असतील, तर रेस्टॉरंट, बार बंद असतील. मात्र, सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत घरपोच पार्सल सुविधा देता येणार आहे. मात्र होम डिलव्हरी करणाऱ्या सर्व कामगारांना ता. दहा एप्रिलपासून कोरोना चाचणी अहवाल सोबत ठेवावा लागणार आहे. त्याची वैधता पंधरा दिवसांची असणार आहे. त्याची शासनाच्या निर्देशानुसार कोरोना लसीकरण करून घ्यावी लागणार आहे. तसेच सर्व धार्मिक स्थळे बंद राहणार आहेत.  सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी असले. दहावी, बारावी वगळता इतर सर्व शाळा, महाविद्याले बंद असतील. लग्न सोहळ्याला पन्नास व्यक्तीपेक्षा अधिकांना उपस्थित राहता येणार नाही. तर अंत्यसंस्कारासाठी वीस व्यक्तांना परवानगी देण्यात आली आहे. 

शिक्षणक्षेत्राच्या आधारवड काळाच्या पडद्याआड, फातेमा झकेरिया यांचे निधन

तापमान तपासूनच प्रवेश द्या

कारखाने व उत्पादक आस्थापना यांनी कर्मचाऱ्यांना तापमान तपासूनच प्रवेश द्या, कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या निर्देशानूसार लसीकरण करून घ्यावे, कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील कर्मचाऱ्यांना पगारी रजा देवून त्यांचे अलगीकरण करावे. तसेच पूर्ण युनिटचे निर्जंतुकीकरण होत नाही, तोर्यंत ते बंद ठेवावे आदी अटी घालण्यात आल्या आहेत. 

होम आयसोलेट रुग्णांना एका फोनवर जेवणाचा डबा घरपोच, 'अन्नपूर्णा'चा पुढाकार


बांधकाम मजुरांची राहण्याची व्यवस्था
बांधकाम करताना ज्या ठिकाणी मजुरांना राहण्याची व्यवस्था आहे. असेच बांधकाम सुरू राहतील. मजुरांची वाहतूक करता येणार नाही. मजुराला कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्याला उपचारादरम्याच्या काळातील पूर्ण मजुरी द्यावी लागणार आहे. ता. दहा एप्रिलपासून कोरोना चाचणी अहवाल मजुरांना सोबत ठेवावा लागणार आहे, त्याची वैधता पंधरा दिवसांची असणार आहे, आदी अटी या आदेशात आहेत.

संपादन - गणेश पिटेकर

loading image