esakal | धुळे विद्यार्थी मारहाण प्रकरण; जालन्यात विद्यार्थी परिषदेने केला राज्यमंत्र्यांचा निषेध 
sakal

बोलून बातमी शोधा

abvp jalna.jpg

राज्यमंत्री अब्दुल सत्तारा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन. 

धुळे विद्यार्थी मारहाण प्रकरण; जालन्यात विद्यार्थी परिषदेने केला राज्यमंत्र्यांचा निषेध 

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे गुरूवारी (ता.२७) शहरातील गांधी चमन येथे दहन केले आहे. यावेळी राज्यमंत्री श्री. सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी ही करण्यात आली आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..
 
धुळे येथे बुधवारी (ता.२६) राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी ताफा अडविला होता. त्यानंतर पोलिसांसह त्यांच्या सुरक्षारक्षकांनी या आंदोलनकार्त्यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर या घटनेचे सर्वत्र पडसाद उमटू लागले आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी जालना शहरातील गांधी चमन येथे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे गुरूवारी (ता.२७) दहन केले. तसेच राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या राजीनाम्याची मागणी करीत जोरदार घोषणाबाजी केली. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या एकूण शुल्कापैकी ३० टक्के शुल्क सरसकट माफ करावे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

निकालाचे पुर्नमुल्यांकन करावे, नवीन शैक्षणिक प्रवेशाच्या वेळी एकूण शैक्षणिक शुल्काचे जास्ती जास्त १५ टक्के शुल्क घेवून प्रवेश द्यावा उर्वरीत शैक्षणिक शुल्क चार टप्पयात घेण्यात यावी, खासगी विद्यापीठाच्या शैक्षणिक शुल्काच्या नियंत्रणासाठी राज्यस्तरीय शुक्ल नियंत्रण समिती गठीत करावी, अशा विविध मागणी ही यावेळी करण्यात आल्या आहेत. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार) 

loading image