लातूर जिल्ह्यात तब्बल ८०० जनावरांना लम्पी स्किन ! शेतकरी चिंताग्रस्त.

jalkot.jpg
jalkot.jpg

लातूर : लम्पी स्कीन रोग हा विषाणुजन्य आजार असून याचा प्रसार बाहय किटक व बाधित जनावरांना चांगल्या जनावरांशी संपर्क आल्यामुळे संसर्ग होत आहे. त्यामुळे पशुपालकांनी बाधीत जनावरे इतर पशुधनापासून वेगळे ठेवावीत. जिल्हयात लम्पी स्किन रोगाचा प्रथम प्रार्दूभाव अहमदपूर तालुक्यात दिसून आला व या आजाराचे रुग्ण जिल्हयामध्ये इतर तालुक्यात ही दिसून येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पशूपालकांनी पशूधनास लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पशूसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

हा रोग प्रामुख्याने गाय वर्गामध्ये जास्त प्रमाणात आढळून येत आहे.  म्हैस वर्गामध्ये या रोगाचा प्रार्दूभाव कमी प्रमाणात दिसून येत आहे. या रोगामध्ये अंगावर गाठी येणे, ताप येणे, पायावर व पोळीवर सूज येणे अशी लक्षणे दिसून येतात. जिल्हयातील 168 गावामध्ये 800 जनावरे बाधीत झाली होती व सदरील बाधीत जनांवरांवर योग्य ते औषधोपचार नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत करण्यात आलेली आहेत. जिल्हयामध्ये एकूण 47 हजार 800 लसमात्रा उपलब्ध आहेत. जिल्हयातील सर्व पशुवैद्यकीय संस्थांना याचा पुरवठा करण्यात आलेला आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
जिल्हयात एकूण २१ हजार २२ ऐवढे लसीकरण करण्यात आले आहे. बाधीत पशुधन आढळलेल्या गावाच्या ५ किलोमीटर क्षेत्रात लसीकरण होत आहे. नवीन गावामध्ये या आजाराचे तुरळक रुग्ण आढळून येत असल्याने पशुपालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. या बाबत जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल केंद्रे, पशुसंवर्धन व दुग्ध विकास सभापती गोविंद चिलकुरे यांनी लसीकरणाची गती वाढवीण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच जिल्हयातील सर्व बाधित गावामध्ये लसीकरण करणेबाबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनीही पशुसंवर्धन विभागास सूचना दिल्या आहेत.

त्यानुसार रोगाचा प्रार्दूभाव पाहता आणखी ५० हजार लस उपलब्ध करुन देण्‍यात येणार आहे. जिल्हयातील सर्व गावामध्ये लसीकरण करण्यात येणार असल्याने आपल्या पशुधनास लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजकुमार पडीले यांनी केले आहे. तसेच या रोगामध्ये कुठल्याही प्रकारची मरतुक होत नसल्याने पशुपालकांनी घाबरुन न जाता आपली आजारी जनावरे नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थे मध्ये घेऊन जावून औषधोपचार करुन घ्यावेत असे आवाहनही करण्यात आले आहे.

(संपादन-प्रताप अवचार)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com