corona Update : लातूरात कोरोनामुळे चौघांचा मृत्यू, एकूण बळींची संख्या ४२ वर

corona death.jpg
corona death.jpg

लातूर : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच कोरोनामुळे मृत्यूचे तांडवही सुरुच आहे. सोमवारी कोरोनामुळे तीघांचा मृत्यू झाला होता. त्या पाठोपाठ मंगळवारी (ता. १४) देखील दिवसभरात कोरोनाने चौघाचा बळी घेतला आहे. यात येथील एका डॉक्टरांच्या वडिलांचा समावेश आहे.  हे चारही रुग्ण ५० वर्षापेक्षा अधिक वयाचे आहेत. या चौघांच्या मृत्यूमुळे आता जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४२ वर गेली आहे. 

जिल्ह्यात वृद्ध नागरीकांवरच कोरोनाचा जास्त ॲटक होताना दिसत आहे. यात बळी जाण्यांची संख्या देखील वृद्धांचीच आहे.  त्यामुळे घराघरातील वृद्धांची काळजी घेण्याची गरज आहे. 

लातूर जिल्ह्यात सोमवारी उदगीर, निलंगा व औसा येथील एका ज्येष्ठ नागरीकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्या पाठोपाठ मंगळवारी (ता. १४) कोरोनाने चौघांचा बळी घेतला आहे. यात दोन महिलांचा समावेश आहे. यात येथील रामगल्लीतील ७० वर्षीय ज्येष्ठ महिलेचा समावेश आहे.

तसेच निलंगा येथील ५२ वर्षीय महिला व ६५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तसेच येथील एका डॉक्टरांचे ६८ वर्षीय वडीलांना कोरोनाची लागण झाली होती. दोन दिवसापूर्वी त्यांना येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यात उपचार सुरु असताना मंगळवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा आता ४२ वर गेला आहे. 

१९ जणांना कोरोनाची लागण  
दरम्यान मंगळवारी १९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात लातूर शहरातील १२, दापका (ता. निलंगा) येथील तीन, गुळखेडा (ता. औसा) येथील एक, देवणी येथील तीघांचा समावेश आहे. यात नऊ पुरुष आणि दहा महिलांचा समावेश आहे. चार वर्षापासून ते ७० वर्ष वयोगटातील हे नागरीक आहेत.

(संपादन : प्रताप अवचार)
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com