Coronavirus : कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये लातूर जिल्हा महाराष्ट्रात दुसरा 

हरी तुगावकर
Saturday, 10 October 2020

९४ हजार ७५७ व्यक्ती आल्या हायरिस्क; तातडीने झाले उपचार 

लातूर : जिल्ह्यात १८ हजार १४३ रुग्ण पॉझिटिव्ह असून, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या माध्यमातून ३ लाख ९० हजार ३१ व्यक्तींची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात आलेली आहे. यामध्ये ९४ हजार ७५७ व्यक्ती या हायरिस्क कॉन्टॅक्ट होत्या तर २ लाख ६१ हजार २८९ व्यक्ती या लोरिस्क कॉन्टॅक्टस् असल्याने लातूर जिल्हा राज्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये दुसरा असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

कोविड-१९ बाधित रुग्णांच्या निकट सहवासींताचा सर्वे करून रुग्णांचे हायरीस्क, लोरीस्क कॉन्टॅक्ट शोधून काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली. त्यानुसार हायरिस्क सहवासीतांचे संस्थात्मक विलगीकरण करून आवश्यकतेप्रमाणे स्वॅब तपासणी करण्यात आले. त्यामधून पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना व त्यांच्या सहवासीतांचे विलगीकरण करण्यात आले. तसेच कोविड-१९ बाधित रुग्णांचे असलेले लोरिस्क सहवासीतांना गृह विलगीकरण करण्यात आले. त्यांचे पुढील १४ दिवस आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी करून आवश्यकतेप्रमाणे संदर्भ सेवा देण्यात आली, अशी माहिती त्यांनी दिली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या माध्यमातून हायरिस्क कॉन्टॅक्टसच्या तपासणीतून कोविड-१९ रुग्ण लवकरात लवकर शोधून काढण्यात आले. या तपासणीतून जे रुग्ण पॉझिटिव्ह आले, त्यांचे तत्काळ संस्थात्मक अथवा गृह अलगिकरण करून उपचाराखाली आणण्यात आले. जे व्यक्ती लोरिस्क कॉन्टॅक्टस होते त्यांचे गृह विलगीकरण करण्यात आले. त्यामुळे ट्रान्समिशन चैन लवकर खंडित करण्यामध्ये यश आले. त्यामुळे रुग्णांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी फार मोठी मदत झाली. पर्यायाने मृत्यूदर कमी होण्यासाठी मदत झाली, अशी माहिती डॉ. परगे यांनी दिली. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 

(Edit- Pratap Awachar)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur district second in Maharashtra For contact tracing