भूमिपुत्र महानिरीक्षकपदी आल्याचा शिरूर अनंतपाळकरांना हर्ष; निसार तांबोळी नांदेडचे नवे 'आयजी'

misar tanboli.jpg
misar tanboli.jpg

शिरूर अनंतपाळ : येथील रहिवाशी निसार तांबोळी यांची सरकारने बुधवारी (ता. दोन) नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती केल्याचे वृत्त कळताच नागरिकांना आनंद झाला. भूमिपुत्राच्या आपल्याच भागातील मोठ्य़ा पदावर झालेल्या नियुक्तीचा शिरूर अनंतपाळकरांना अभिमान वाटत आहे. यानिमित्ताने तांबोळी यांनी परिश्रमाने या पदापर्यंत मारलेली मजल व त्यांचा जीवनप्रवास सर्वांना प्रेरणादायी ठरत आहे.

श्री. तांबोळी यांचे आई, वडील व भाऊ येथेच वास्तव्यास असून वडील पिरमहमद तांबोळी हे डॉक्टर असून भाऊ व्यवसायात आहेत. बहिण लातूर येथे आहे. तांबोळी यांचे शालेय शिक्षण सातारा येथील सैनिक स्कुलमध्ये झाले. मराठवाडा कृषी विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत असतानाच त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्या सेवा परीक्षेतून त्यांची पहिल्याच प्रयत्नात पोलिस उपअधीक्षकपदी निवड झाली. १९९६ मध्ये ते हिंगोली येथे पहिल्यांदा रूजू झाले. तेथून भोकर व वर्धा येथे काम केल्यानंतर नंदूरबार येथे २००६ मध्ये त्यांची पदोन्नतीने अपर पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाली.

नंदूरबारनंतर त्यांनी मुंबईत या पदावर विविध ठिकाणी काम केले. २०१३ मध्ये त्यांना भारतीय पोलिस सेवेत (आयपीएस) पदोन्नती मिळाली. काही वर्ष राज्यातील अन्य जिल्ह्यात काम केल्यानंतर ते पुन्हा मुंबईत आले. गेल्यावर्षी त्यांना विशेष पोलिस महानिरीक्षकपदी पदोन्नती मिळाली. या पदावर मुंबईतच ते कार्यरत होते. बुधवारी त्यांची नांदेडला बदली झाली. मुंबईतील त्यांचे काम उल्लेखनीय व कौतुकास्पद ठरले. मुंबईतील त्यांच्या कामाची सातत्याने होणारी चर्चा अनंतपाळकरांचा अभिमान वाढवणारी ठरत होती. बुधवारी नांदेडला बदली झाल्यानंतर त्यात आणखी भर पडली आणि श्री. तांबोळी यांचा  जीवनप्रवास ठळकपणे समोर आला.    

ज्या भागात विशेष पोलिस महानिरीक्षकपदाच्या अधिनस्त काम केले. त्याच भागात योगायोगाने या पदावर झालेल्या बदलीने मला आनंद झाला आहे. माझ्या पोलिस दलाच्या सेवेची सुरवात याच भागात झाल्याने पुन्हा मी या भागात येईल, असे कधी वाटले नव्हते. यानिमित्ताने जन्मभूमीची सेवा करण्याची संधी मिळाली असून हा योगायोग निश्चितच चांगला करण्याचा माझा प्रयत्न राहिल.
- निसार तांबोळी, विशेष पोलिस महानिरीक्षक, नांदेड. 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com