Love-Story : पाकीस्तान बॉर्डर ते उस्मानाबाद..! अखेर असा पोहचला पठ्ठ्या..

तानाजी जाधवर
Wednesday, 29 July 2020

जिशान सिद्दीकी याची गुजरात मधील न्यायालयाने जामीनावर मुक्तता केल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक आशिष खांडेकर यांचे पथक गुजरात राज्यात रवाना झाले होते. जिशान सिद्दीकी यास (ता.२७) रोजी ताब्यात घेउन (ता. २९) रोजी उस्मानाबाद येथे आणुन वडील- सलीम निजामोद्दीन सिद्दीकी यांच्या ताब्यात दिले आहे.

उस्मानाबाद : जिशान सलीम सिद्दीकी (वय २०) रा. खॉजानगर हा ११ जुलै रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मोबाईल फोन दुरुस्तीचा बहाना करुन घराबाहेर पडला. परंतु घरी परतलाच नाही. यावर त्याच्या कुटूंबीयांनी सायंकाळीच पोलिस ठाणे शहर गाठून बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   

पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन यांना याची माहिती समजताच त्यांनी उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा, सायबर पोलिस ठाणे यांना संबंधीत तरुणाचा शोध घेण्यास सांगीतले. यावर पोलीस पथकाने जिशानच्या सोशल मिडीया अकाऊंटची सखोल माहिती घेतली होती, त्या तरुणाचे तथाकथीत पाकिस्तानी तरुणीशी प्रेमसंबंधाने चॅटींग सुरु असल्याचे व भेटीसाठी ती तरुणी त्याला पाकिस्तानात बोलवत असल्याचे लक्षात आले.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

उस्मानाबाद पोलीसांच्या सायबर विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाने जिशानचा ठावठिकाणा प्राप्त केला. यावर तो कच्छ (गुजरात) परिसरात असल्याचे समजले. पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन यांनी ही हकीकत व जिशानची छायाचित्रे कच्छ (पुर्व) चे पोलीस अधीक्षक व इतर तपास यंत्रणांना कळवून त्यांच्याशी चर्चा केली. उस्मानाबाद पोलीसांनी दिलेल्या माहितीवरुन सर्व यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. (ता.१६) रोजी जिशान कच्छच्या वाळवंटातून पाकिस्तान सीमेकडे मोटारसायकल वरुन जात असतांना त्याची मोटार सायकल वाळूत फसल्याने त्याने ती सोडून देऊन पाकिस्तान सीमेच्या दिशेने पायी प्रवास सुरु केला.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  
दुपारी चार वाजण्याच्या सुमारास त्याची बेवारस मोटारसायकल बीएसएफ च्या गस्ती पथकास आढळली होती. तर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास जिशान यास बीएसएफ बटालीयन पथकास हाती लागला होता. जिशान यास आणण्यास उस्मानाबाद (शहर) पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक शकील शेख यांसह पथक (ता.१७) रोजी गुजरात येथे रवाना झाले होते.

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

परंतु भारत-पाकिस्तान सीमेवरील प्रतिबंधीत क्षेत्रात प्रवेश केल्यामुळे जिशान सिद्दीकी याच्या विरुध्द गुजरात राज्यातील कच्छ विभाग, गांधीधाम (पुर्व) जिल्ह्यातील खदीर पोलीस ठाणे येथे कलम १८८ सह क्रिमीनल लॉ ॲमेन्डमेंट ॲक्ट कलम तीन (१), ६ नुसार गुन्हा दाखल झाल्याने उस्मानाबाद पोलीस पथकास जिशानचा ताबा मिळाला नव्हता.

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 

जिशान सिद्दीकी याची गुजरात मधील न्यायालयाने जामीनावर मुक्तता केल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक आशिष खांडेकर यांचे पथक गुजरात राज्यात रवाना झाले होते. जिशान सिद्दीकी यास (ता.२७) रोजी ताब्यात घेउन (ता. २९) रोजी उस्मानाबाद येथे आणुन वडील- सलीम निजामोद्दीन सिद्दीकी यांच्या ताब्यात दिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan border to Osamanabad missing young boy Surrendered family