esakal | पालक झाले हैराण, आरटीईची हेल्पलाईन अस्तित्वातच नाही
sakal

बोलून बातमी शोधा

Latur News

आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने अनेक पालकांना आपल्या पाल्यासाठी चांगल्या शाळांत प्रवेश घेता येत नाही. ही संधी मिळावी, शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून सरकारने आरटीई प्रवेशप्रक्रिया सुरू केली आहे. या प्रवेशप्रक्रियेची सुरवात १२ फेब्रुवारीपासून करण्यात आली आहे.

पालक झाले हैराण, आरटीईची हेल्पलाईन अस्तित्वातच नाही

sakal_logo
By
सुशांत सांगवे

लातूर : बालकांच्या मोफत व सक्‍तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या २५ टक्के प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करताना पालकांना ‘एसएमएस’च येत नसल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबतची तक्रार करण्यासाठी पालकांनी आरटीईच्या संकेतस्थळावरील हेल्पलाईन क्रमांकावर दूरध्वनी लावला तर ‘हा क्रमांक अस्तित्वातच नाही’ असे उत्तर पालकांना मिळू लागले आहे. त्यामुळे यंदाही या प्रवेशप्रक्रियेत ‘तांत्रिक गोंधळ’ कायम असल्याचेच दिसून येत आहे.

परीक्षेत पास करतो, म्हणून तिला एकटीलाच बसवले वर्गात

आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने अनेक पालकांना आपल्या पाल्यासाठी चांगल्या शाळांत प्रवेश घेता येत नाही. ही संधी मिळावी, शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून सरकारने आरटीई प्रवेशप्रक्रिया सुरू केली आहे. या प्रवेशप्रक्रियेची सुरवात १२ फेब्रुवारीपासून करण्यात आली आहे. त्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ जाहीर करण्यात आले आहे. या संकेतस्थळावरील प्रवेश अर्ज पालकांना भरायचा आहे.

आमचे जुळले, तुमचे कसे जुळले जरा सांगा की...

सुरवातीला नोंदणी केल्यानंतर पालकांना एसएमएसच्या माध्यमातून पासवर्ड पाठवला जातो. त्याअधारे पुढील प्रवेश अर्ज भरायचा असतो. पण, हे एसएमएसच अनेक पालकांना शनिवारी (ता. १५) आले नाहीत. त्यामुळे अर्ज भरण्यात अडचणी येत असल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

पुष्पा शर्माचे खुनी निघाले बांधकाम मजूर 

याबाबतच्या तक्रारी करण्यासाठी पालकांनी आरटीईच्या संकेतस्थळावर दिलेल्या हेल्पलाईनशी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला. पण हा क्रमांक अस्तित्वातच नाही, असे उत्तर पालकांना मिळू लागले आहे. त्यामुळे आम्ही तक्रारी करायच्या कोठे? असा सवाल पालकांमधून उपस्थित केला जाऊ लागला आहे.

नांदेडात भरणार शंकर दरबार

राज्यातील ९ हजार ३२८ शाळांत या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. यात लातूरमधील २३५ शाळांचा समावेश आहे. या शाळांत प्रवेशासाठी २ हजार १३० जागा आहेत, असे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. त्यानूसार पालकांनी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पण शिक्षण विभागाकडून एसएमएस येत नसल्याने अनेक पालकांचे अर्ज अर्धवट स्थितीत आहेत.

आरटीई प्रवेशासंदर्भात पालकांच्या ज्या तक्रारी आहेत, त्यांची नक्कीच दखल घेतली जाईल. त्या शिक्षण संचालकांकडे पाठविल्या जातील. पालकांना कुठलीही अडचण येणार नाही, याची काळजी घेतली जाईल.
- डॉ. वैशाली जामदार, शिक्षणाधिकारी

loading image