अंबड : पोहण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा दुधना नदीत बुडून मृत्यू

babasaheb gonte.jpg
babasaheb gonte.jpg

अंबड (जि.जालना) : जालना-अंबड महामार्गावरील गोलापांगरी येथील एका शालेय विद्यार्थ्यांचा शनिवारी (ता.24) दुपारी दुधना नदीत पोहताना बुडून दुर्देवी अंत झाला. या घटनेने गोलापांगरी गावावर शोककळा पसरली आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गोलापांगरी (ता. जि.जालना) येथील नेहरू विद्यालयात इयत्ता नववीमध्ये शिकत असलेल्या शाहिद अहेमद पठाण (15) हा शनिवारी दुपारी गावालगत असलेल्या दुधना नदीत पोहण्यासाठी आपल्या मित्रा सोबत गेला होता. मात्र शाहिद पठाण हा पाण्यात उडी मारून पोहत असताना नदीच्या पाण्यातील भोवऱ्यात अडकल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी मित्राने पाण्यात उडी घेऊन हाताला धरून बाहेर ओढण्याचा प्रयत्नही केला.

मात्र, हा प्रयत्न अयशस्वी ठरला. तो पाण्यात बुडाला त्याचा शोध घेण्यासाठी जालना येथून नगरपालिकेचे पथक गावात दाखल झाले. त्यांनी पाण्यात गळ टाकुन सायंकाळी उशीरा पर्यत शोध घेतला. मात्र शाहिद पठाण न सापडल्याने पालिकेचे पथक जालना शहराकडे परत गेले. 

एकुलता एक होता मुलगा 
शाहिद हा अहेमद पठाण यांचा एकूलता एक मुलगा आहे. त्यांना तीन मुली आहेत. अहेमद पठाण हे वडील मोलमजुरी करून संसाराचा गाडा चालवीत असताना कोविडमुळे शाळेला सुट्टी असल्याने तो मिळेल ते काम करून कुटुंबाला आर्थिक मदत करीत होता. या दुर्दैवी घटनेने गोलापांगरीसह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com