विधानसभा अध्यक्षांच्या बैठकीत बीडचे विधिज्ञ मांडणार शेतकऱ्यांचे हे प्रश्न..! वाचा सविस्तर..

दत्ता देशमुख
Sunday, 26 July 2020

सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्वतः हून जनहित याचिका दाखल करून सदरील कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्याला सर्वोच्च न्यायालयातून स्थगिती मिळाली आहे. आता बियाणे कंपन्या व विक्रेते यांच्यावर पुढील कार्यवाही करण्यासाठी या बैठकीत विचार विनीमय होणार आहे.

बीड : सोयाबीनच्या बोगस बियाणांमुळे राज्यभरातील शेतकरी हैराण आहेत. याबाबत ता. ३० जुलै रोजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात होणाऱ्या बैठकीसाठी बीडचे विधिज्ञ विशाल कदम यांनाही निमंत्रीत केले आहे. त्यांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नालाही वाचा फुटणार आहे.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

या हंगामात पाऊस वेळेवर पडला आणि शेतकऱ्यांनी पेरणीही लवकर उरकून घेतली. परंतु, अनेक कंपन्यांचे सोयाबीन उगवलेच नसल्याचे प्रकार राज्यभरात घडले. प्रत्येक जिल्ह्यांत अशा हजारो तक्रारी आहेत. सोयाबीन बियाणे उगवले नसल्याचे पंचनामे झाले. अनेक ठिकाणी गुन्हेही नोंद झाले आहेत. परंतु, बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्याचा मुद्दा अद्यापही दुर्लक्षीत आहे. 

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

दरम्यान, अमरावती जिल्ह्यात ग्रीन गोल्ड, इगल सिड्स कंपनी, महाबीज सिड्स कंपनी, मार्कीव सिड्स कंपनी, व्हिगर सिड्स, अंकुर सिड्स कंपनींबाबत आमदार रवी राणा यांनी तक्रार केली आहे. त्याअनुषंगाने बियाणांची विक्री करणारे व पुरवठादार यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात तसेच भारतीय संविधानातील तरतुदीनुसार बोगस बियाण्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्याकरिता विशेष न्यायाधिकरण स्थापन करण्याबाबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी ता. ३० जुलै रोजी बैठक बोलविली आहे. मराठवाड्यातील बोगस बियाणे विक्रेते व पुरवठादार यांच्यावर कार्यवाही व्हावी म्हणून काँग्रेसचे नेते देवानंद पवार काँग्रेस प्रवक्ते संजय लाखे पाटील यांनी देखील तक्रार केलेली आहे. 

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्वतः हून जनहित याचिका दाखल करून सदरील कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्याला सर्वोच्च न्यायालयातून स्थगिती मिळाली आहे. आता बियाणे कंपन्या व विक्रेते यांच्यावर पुढील कार्यवाही करण्यासाठी या बैठकीत विचार विनीमय होणार आहे.

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 

या बैठकीत मत मांडण्याची संधी बीडचे विधीज्ञ विशाल कदम यांनाही भेटली आहे. कृषिमंत्री, कृषी विभागाचे मुख्य सचिव, आमदार रवी राणा, राज्याचे अॅडव्होकेट जनरल, असिस्टंट सॉलिसिटर जनरल अजय तल्लार यांच्यासह काँग्रेसचे किसान सेलचे देवानंद पवार, संजय लाखे पाटील व विशाल कदम उपस्थित असणार आहेत.

edited by pratap awachar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Speaker of the Assembly with Beed lawyer meeting present farmer problem