जालना जिल्ह्यात बारा हजार जण कोरोनामुक्त, नवीन २४ कोरोनाबाधित

3Corona_102
3Corona_102

जालना : जिल्ह्यात आतापर्यंत १३ हजार ७८ जण कोरोनाबाधित आढळले. या संकटकाळात डॉक्टर, आरोग्य तसेच प्रशासकीय यंत्रणेने घेतलेल्या अहोरात्र परिश्रमामुळे तब्बल बारा हजार ४३१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. अर्थात कोरोनाचा विळखा काही सुटलेला नाही. बाधितांमध्ये भर पडतच आहे. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा उपाययोजनांसह नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अनेकांच्या मनातील कोरोनाची भीती संपली आहे. विशेष म्हणजे बाजारपेठेमध्ये सॅनिटायझर, मास्कचा वापर अनेकजण करताना दिसत नाही. कोरोना संसर्ग पसरू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या नियमांचे कोठे ही पालन केले जात नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात रविवारी (ता.२७) २४ नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले.

यामध्ये जालना शहरातील आठ, तालुक्यातील वाघ्रुळ, कारला, आनंदवाडी, सारवाडी येथील प्रत्येकी एक, मंठा शहरातील एक, परतूर शहरातील दोन, अंबड शहरातील एक, तालुक्यातील ढाकलगाव येथील एक, जाफराबाद तालुक्यातील गणेशपूर येथील एक, भोकरदन शहरातील एक व बुलडाणा जिल्ह्यातील सहा जणांचे कोरोनाचाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शिवाय दोन कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला. दरम्यान, आठ जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ३४५ जणांचा मृत्यू झालेला आहे. सध्या जिल्ह्यातील ३०२ कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

चाचण्या वाढल्या मागील काही दिवसांपासून कोरोना चाचण्या कमी केल्या जात आहेत. या संदर्भात 'सकाळ'ने पाठपुरावा केल्यानंतर रविवारी आरोग्य यंत्रणेकडून एकूण २५५ नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांपैकी २४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. प्रशासनाने दक्षता बाळगणे गरजेचे कोरोनाचे संकट कमी झाल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत असले तरी यासंदर्भात गाफील राहून चालणार नाही. त्यामुळे कोरोना प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या नियमांचे पालन व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाने दक्ष राहणे गरजेचे आहे.



जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी
एकूण कोरोनाबाधित ः १३ हजार ७८
एकूण कोरोनामुक्त ः १२ हजार ४३१
एकूण मृत्यू ः ३४५
उपचार सुरू ः ३०२
 

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com