
अंबडमध्ये दोन व्यापारी संघाचे वेगवेगळे निर्णय : व्यापारी महासंघाने चार दिवस बाजारपेठ बंद ठेवण्यासाठी घेतली बैठक. तर नवीन व्यापारी संघाने केला विरोधात, म्हणाले बाजारपेठ सुरुच राहणार आहे.
कोरोनामुळे अबंड शहरात दोन व्यापारी संघटनात जुंपली !
अंबड (जि.जालना) : अंबडमध्ये व्यापारी महासंघाच्या वतीने शहरात शनिवारी (१२) बैठक घेऊन सलग चार दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे नवीन व्यापारी महासंघाने संघाने सोशल मीडियावरून बाजारपेठ सुरू राहणार असल्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे अंबड शहरात व्यापार्यांबरोबरच नागरिकांमध्ये सध्या चलबिचल झाली आहे. बाजारपेठ नेमकी सुरु राहणार की बंद हे कळण्या मार्ग नाही.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
अंबड शहरातील सर्व लहान व मोठे व्यापारी बंधूंना कळविण्यात येते की, अंबड शहर व तालुक्यात विशेष करून अंबड शहराशी संपर्कात असलेली ग्रामीण भागातील गावे वाढती कोरोना पेशंट संख्या लक्षात घेता व्यापारी पेठेत धोका निर्माण झाला असून काही व्यापारी व त्यांचे परिवार कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत. याचा सारासार विचार करता आज व्यापारी महासंघाची एक बैठक संपन्न झाली. त्यात शहरातील सर्व व्यवसायिक संघटना अध्यक्ष हजर होते. बैठकीत अंबड शहरातील व्यापारी बाजार पेठ बुधवार (ता.१६) ते रविवार (ता.२०) या दिवसापर्यंत बंद ठेवावे. यावर एकमत झाले.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
कोरोना लॉकडाऊन सुरू झाल्या पासून व्यापारी बांधवांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. यात शंकाच नाही. परंतु आजची परिस्थिती बघता आपला जीव वाचवणे खूप महत्वाचे आहे. शेवटी आपला जीव महत्वाचा आहे. हाच शुद्ध हेतू डोळ्यासमोर ठेवून हा कठीण निर्णय घ्यावा लागत आहे. त्यास शहरातील सर्व लहान मोठ्या सर्व व्यापारी बांधवानी पाठींबा द्यावा असे विनम्र आवाहन व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आले.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शनिवारी झालेल्या बैठकीत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष द्वारकादास जाधव, सचिव गणेश बोरडे,अशोक बियाणी, अतुल मालू, जगन्नाथ चौधरी, पांडुरंग जामदरे, आंबदास अंभोरे, शिवाजी बजाज, सुनील मोटवानी, रमेश शहाणे, एकनाथ घायाळ,अरुण भवर,संजय जोशी,ओमप्रकाश उबाळे, विशाल गिलडा, महेंद्र संगेवार, राजेंद्र पटवारी, भीमराव शिंगाडे नाना, अजीज बेग, शिवप्रसाद चांडक, हे व्यापारी प्रतिनीधी उपस्थित होते.
नवीन व्यापारी महासंघ म्हणते बाजारपेठ सुरुच.
नवीन व्यापारी महासंघाच्या वतीने बाजारपेठ बंद राहणार नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सुरक्षितता व स्वछता अंगी बाळगत दुकाने सुरू ठेवण्याचे आवाहन अध्यक्ष गोवर्धन भोरे, सचिव समदभाई बागवान यांनी सोशल मीडियावरून केले आहे. यामुळे व्यापारी व नागरिक सध्या संभ्रमात पडले आहे. यामुळे अंबड शहर व परिसरात चलबीचल सुरू आहे.
(संपादन-प्रताप अवचार)
Web Title: Two Trade Associations Face Amband News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..