उदगीर : आता ज्येष्ठ नागरिकांची एकाच दिवशी आरोग्य तपासणी

latur news
latur news

उदगीर (लातूर) : उदगीर शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात येत आहे. परंतु दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाबाधित रुग्ण संख्येमुळे चिंता वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर महसूल, आरोग्य व नगरपालिका प्रशासनाच्या वतीने शहरातील पन्नास वर्षे वयाच्या पुढील सर्व नागरिकांची रविवारी (ता.२८) एकाच दिवशी दिवसभर आरोग्य तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. अशी माहिती उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी आणि तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी दिली आहे.

शहरातील कोरोना परिस्थिती पाहता विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर आणि जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी येथील ५० वर्षे वयाच्या पुढील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात यावी अशा सूचना केलेल्या आहेत. या अनुषंगाने उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी आणि तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी शुक्रवारी (ता.२६) उदगीर मधील सर्व यंत्रणाची बैठक घेतली.

या बैठक उपजिल्हाधिकारी श्री मेंगशेट्टी यांच्या संकल्पनेनुसार उदगीर शहरातील ५० वर्षे वयाच्या पुढील सर्व नागरिकांची एकाच दिवशी रविवारी आरोग्य तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. महसूल विभाग, आरोग्य विभाग व नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने एकाच दिवशी ही मोहीम उदगीर शहरात राबविण्यात येणार असून सदर मोहिमेची पूर्वतयारी मागच्या आठवडाभरापासून प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. 
उदगीर शहरात ज्येष्ठ नागरिकांची सुमारे २० हजार इतकी संख्या आहे आहे.  या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी १८५ पथक गठित करण्यात आलेली आहेत. या पथकामध्ये एक वैद्यकीय कर्मचारी असून त्यांच्या मदतीला मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, इतर कर्मचारी व शिक्षक यांच्या नियुक्त्या करण्यात आलेले आहेत.

या विशेष आरोग्य तपासणी मोहिमेसाठी उदगीर शहराची एकूण सहा उपविभागात विभागणी करण्यात आलेले आहे. यासाठी तालुक्यातील हेर , देवर्जन ,  नळगीर , वाढवणा , हंडरगुळी या प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, नगरपालिका कर्मचारी  यांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले आहे. उदगीर शहरात आजपर्यंत कोरोना मूळे सहा जणांचा बळी गेलेला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने एकाच दिवशी सर्व ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 

या विशेष मोहिमेत आरोग्य पथके प्रत्येक घरात जाऊन घरातील ज्येष्ठ नागरिकांच्या आजाराची माहिती घेत ऑक्सीप्लस  मीटर , थर्मल स्क्रीनिंग द्वारे आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे तहसीलदार श्री मुंडे यांनी सांगितले. 

मराठवाड्यातील पहिलाच प्रयोग

कोरोनाच्या संसर्गामुळे बळी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासनाने आखलेली एका दिवसात आरोग्य तपासणी ही संकल्पना मराठवाड्यातील पहिलाच प्रयोग आहे. संबंध लातूर जिल्ह्यात संबंधित कर्मचारी दररोज ठिकठिकाणची तपासणी करत आहेत. मात्र सव्वा लाख लोकसंख्या असलेल्या उदगीर शहराची एकाच दिवशी तपासणी हा मराठवाड्यातील पहिलाच प्रयोग आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com