CORONAVIRUS : उदगीरात तिघांचा मृत्यू : पुन्हा नऊ जणांना कोरोनाची बाधा 

युवराज धोतरे 
Tuesday, 21 July 2020

शहर व परिसरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. सोमवारी (ता २०) रात्री उशिरा आलेल्या अहवालात नऊ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आला आहे. येथील कोविड रुग्णालयात मंगळवारी (ता.२१) रात्री एक वाजता एका कोरोनाबाधीत तर सकाळी एक सारीच्या व एका कोरोनाबाधीत अशा तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

उदगीर (उस्मानाबाद) : शहर व परिसरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. सोमवारी (ता २०) रात्री उशिरा आलेल्या अहवालात नऊ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आला आहे. येथील कोविड रुग्णालयात मंगळवारी (ता.२१) रात्री एक वाजता एका कोरोनाबाधीत तर सकाळी एक सारीच्या व एका कोरोनाबाधीत अशा तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 

शहर व परिसरातील कोरोनाची बाधा झालेल्यांची एकुण संख्या आता २३३ वर पोहचली आहे. सोमवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात देवर्जन ४, देगलुर रोड  १, वेल्हाळ रोड १, अशोक नगर १, धोडीहिप्परगा १, सामान्य रूग्णालय निवास १ एवढ्या रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 
मंगळवारी रात्री एकच्या सुमारास  शहरातील शाहू कॉलनी भागातील एका महीलेचा दमा, सारीसदृश्य आजाराने मृत्यू झाला आहे. सकाळी साडेसातच्या सुमारास गोविंदनगर भागातील एका सारीच्या महीला रुग्णाचा मृत्यू झाला. साडेआठच्या सुमारास नळगीर (ता.उदगीर) येथील ऐशी वर्षाच्या महीलेचा मृत्यू झाला आहे. सारीने मृत्यू झालेल्यांचा स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. यापैकी एका महीलेचे वय ३५ वर्षे तर दुसऱ्या महिलेचे वय ४५ वर्षे असल्याने खळबळ उडाली आहे. 

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

सद्या येथील कोरोना रुग्णालयात उदगीर २०५, जळकोट ३, निलंगा २, अहमदपूर ६, मुंबई ३, चाकूर ३, हैदराबाद १, मुखेड ४, देवणी ५, बिदर १ अशा कोरोणाची बाधा झालेल्या २३३ रुग्णांची नोंद झाली आहे. पैकी १७ जणांचा मृत्यू झाला झाला आहे. यापैकी १४८ रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने घरी पाठवण्यात आले आहे. आठ रुग्णांना उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे. सध्या कोविंड रुग्णालयात ३३ तर तोंडार पाटी येथील कोविड केअर सेंटर येथे २१ रुग्णांवर उपचार चालू आहेत. पैकी चार रुग्णांची स्थिती गंभीर असल्याची माहिती माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतिश हरिदास व कोव्हिड रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. शशिकांत देशपांडे यांनी दिली आहे.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

(संपादन : प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Umarga today three death and nine new corona patient