esakal | सावधान! कोकणात जाणारे चारही घाटमार्ग धोकादायक स्थितीत; वाहनचालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास...
sakal

बोलून बातमी शोधा

ghat roadq

घाटांत वारंवार होणारे अपघात व पावसाळ्यात होणारे भूस्खलनामुळे वाहतूक व्यवस्थाही अडचणीत सापडली आहे. कोकणातील प्रवास हा घाटातूनच होत असतो. रायगड जिल्ह्यातून रत्नागिरी, पुणे, सातारा अशा अन्य जिल्ह्यांत जाण्यासाठी घाटात वापर करावा लागतो.

सावधान! कोकणात जाणारे चारही घाटमार्ग धोकादायक स्थितीत; वाहनचालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास...

sakal_logo
By
सुनील पाटकर

महाड (बातमीदार) : मुंबई-गोवा महामार्ग तसेच रायगड जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांना जोडणारे मुंबई-गोवा महामार्ग व अन्य राज्य मार्गावरील चार प्रमुख घाट पावसामुळे धोकादायक होत असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून घाटातून प्रवास करावा लागत आहे.

मुंबईने करून दाखवलं; दररोज केवळ 'इतक्याच' बेडची आवश्यकता...

या प्रमुख घाटांत वारंवार होणारे अपघात व पावसाळ्यात होणारे भूस्खलनामुळे वाहतूक व्यवस्थाही अडचणीत सापडली आहे. कोकणातील प्रवास हा घाटातूनच होत असतो. रायगड जिल्ह्यातून रत्नागिरी, पुणे, सातारा अशा अन्य जिल्ह्यांत जाण्यासाठी घाटात वापर करावा लागतो. कोकणातून अन्य ठिकाणी जायचे असेल तर घाटाला पर्याय नाही. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाट, माणगाव-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाट, महाड-पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाट तर महाड-पुणे-पंढरपूर मार्गावरील वाघजई वरंध घाट हे या भागातील प्रमुख रस्त्यावरील महत्त्वाचे घाट आहेत. 

सीबीएसईच्या बारावीच्या निकालात मुलींची बाजी; तब्बल दोन लाख विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण... ​

यासर्व घाटांतून दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात प्रवासी व मालवाहतूक सुरू असते. पावसाळ्यात या घाटातील प्रवास म्हणजे संकटाला निमंत्रण अशी स्थिती वाहनचालकांची झाली आहे. आपत्कालीन स्थितीत या घाटांना जवळचे पर्यायी मार्ग नसल्याने अनेक वाहनचालकांना घाट बंद झाल्यानंतर दूरचा प्रवास मार्ग अवलंबावा लागतो. त्यामुळे वाहनचालकांची व प्रवाशांची मोठी गैरसोय होते. घाटांचे रुंदीकरण, मोऱ्या वाढवणे, रिफ्लेक्टर फलक, बॅरी गेटर्स अशा कामांची पूर्तता करण्यात येत असली तरीही अनेक कामे बाकी राहिली आहेत. अतिवृष्टीमुळे खचणाऱ्या घाट यामुळे बांधकाम विभागालाही नांगी टाकावी लागलेली आहे. अशा नैसर्गिक संकटांचा सामना वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे. 

मराठी चित्रपटसृष्टी येतेय हळूहळू पूर्वपदावर; टिझर लॉंचिंगसह चित्रीकरणाला सुरुवात...​


कशेडी घाट

 • 19 किलोमीटर लांबी
 • मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाचा घाट
 • गणेशोत्सवात वाहतूक कोंडी
 • रस्ता खचण्याचा व दरड कोसळण्याचा धोका
 • धामणदेवी, भोगाव, चोळइ ठिकाणी धोकादायक.

आंबेनळी घाट

 • 26 किलोमिट लांबी
 • सातारा, कोल्हापूर, वाई, महाबळेश्वर येथे जाण्यासाठी वापर
 • मालवाहतूक व प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात
 • बाहुली टोक, दाभीळ टोक व कॉर्नर, रेडका धबधबा व चिरेखिंड भाग धोकादायक

वाघजई वरंध घाट

 • 22 किलोमीटर लांबी
 • महाड-पुणे मार्गावर अरुंद रस्ता अवघड वळणे
 • वाघजाई मंदिर माझेरी धोकादायक व अनेक धोकादायक वळणे 

ताम्हिणी घाट

 • 16 किलोमीटर लांबी
 • महाड, माणगाव, श्रीवर्धन या मार्गातील पुण्याकडे जाण्यासाठी उपयुक्त
 • दरडीचा धोका

उपचारांसोबत मानसिक आरोग्याची ही काळजी; सेंट जॉर्ज रुग्णालयात डॉक्टरांकडून समुपदेशन...​

भाजी व मालवाहतुकीसाठी आम्हाला वेगळ्या घाटातून प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात मात्र या घाटातील प्रवास जोखीम लक्षात घेऊन आम्ही करत असतो.
- तुळशीराम माने, वाहनचालक

महाड बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या घाटांची पाहणी करण्यात आलेली आहे. तसेच देखभाल दुरुस्तीसाठी वार्षिक तत्त्वावर ठेकेदार नेमले असल्याने दरड कोसळली तर तत्काळ यंत्रसामग्रीसह मदतकार्य पोहोचून दरडी काढण्याचे काम तत्काळ केले जाते.
-बी. एन. बहिर, कार्यकारी अभियंता, महाड

--
संपादन : ऋषिराज तायडे