भिवंडी महापालिकेच्या 525 कर्मचारी कुटुंबांवर टांगती तलवार; प्रशासनाचे दुर्लक्ष

भिवंडी पालिकेच्या 525 कर्मचारी कुटुंबांवर टांगती तलवार; प्रशासनाचे दुर्लक्ष
भिवंडी पालिकेच्या 525 कर्मचारी कुटुंबांवर टांगती तलवार; प्रशासनाचे दुर्लक्ष

भिवंडी : भिवंडीतील पटेल कंपाऊंड येथील तीन मजली जिलानी इमारत सोमवारी (ता.21) कोसळली. यात 38 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर पालिका प्रशासनाने धोकादायक व अतिधोकादायक इमारतींना नोटीस पाठवण्याचा कार्यक्रम हाती घेतला. मात्र पालिकेचे अधिकारी व कर्मचारी राहत असलेल्या निवासस्थानांकडे व इमारतींकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे जवळपास 525 कर्मचारी कुटुंबांतील अडीच ते तीन हजार नागरिकांवर टांगती तलवार उभी राहिली आहे. पालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने केली आहे.

भिवंडीतील जिलानी दुर्घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेत धोकादायक इमारतीवर कारवाईचे आदेश दिले आहेत. असे असतानाही पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरातील 782 धोकादायक इमारतींमधील 18 हजार कुटुंबांवर धोक्‍याची टांगती तलवार कायम आहे; तर 525 कर्मचारी-अधिकारी कुटुंबांनाही जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहेत. प्रभाग पाचमध्ये पालिकेच्या या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी 46 निवासस्थाने आहेत. यातील बहुतांशी घरे व इमारती 30 ते 45 वर्ष जुनी असून सध्या त्यांची दुरुस्ती न झाल्याने ती दुरवस्थेत आहेत. पालिकेने त्यांना वारंवार नोटिसा पाठवल्या आहेत. मात्र त्यांच्या राहण्याची सोय करण्याबाबत पर्यायी व्यवस्था नसल्याने निवासस्थाने खाली करण्यास कर्मचारी तयार नाहीत. 

 
या परिसरात कर्मचाऱ्यांचे वास्तव्य 
शहरातील संगम पाडा (172 कुटुंबे ), कोंबड पाडा (56 कुटुंबे ), पद्मनगर (72 कुटुंबे), धामणकर नाका फायर फिकेट (10 कुटुंबे), वाजमोहल्ला (32 कुटुंबे), पाणीपुरवठा पद्मनगर (36 कुटुंबे), कोटारगेट आझाद गार्डन (32 कुटुंबे ), भैय्यासाहेब आंबेडकर नगर (12 कुटुंबे), शिवाजी नगर भाजी मार्केट (48 कुटुंबे), सर्व पाण्याच्या टाक्‍या, ममता हॉस्पिटल मिल्लत नगर, कामतघर, पद्मनगर प्रेमाताई हॉल, भावना मंगल कार्यालय ताडली, फेणे गाव, शास्त्रीनगर (19 कुटुंबे), अजय नगर पम्पिंग स्टेशन (10 कुटुंबे), फायर ब्रिगेड कासार आळी (8 कुटुंबे) अशी 46 निवासस्थाने पालिका कार्यक्षेत्रात आहेत. 

पालिका कर्मचाऱ्यांच्या इमारतींवर गेल्या दहा वर्षांत दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे कागदावर दाखवण्यात आले आहे. प्रत्यक्षात बहुतांश ठिकाणी घरांचे प्लास्टर निखळले आहे, तर काही इमारतीवर झाडे उगवली आहेत. याबाबत रहिवासी कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या बांधकाम व उद्यान विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र ती झाडे तोडली गेली नसल्याने इमारत कमकुवत झाली आहे. 
- भानुदास भसाळे, अध्यक्ष, भारतीय कामगार कर्मचारी महासंघ. 

----------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com