फडणवीस अडचणीत; 46 हजार कोटींच्या गैरव्यवहाराचा भाजपच्या माजी आमदाराचा आरोप

टीम ई-सकाळ
सोमवार, 2 डिसेंबर 2019

अनिल गोटे यांनी आपल्या अधिकृत लेटर हेडवर एक प्रत्रक प्रसिद्धीस दिले असून, ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. हे पत्रक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले असून, समृद्दी कॉरिडॉरची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. 

मुंबई : केंद्र सरकारकडून आलेले 40 हजार कोटी परत करण्यासाठी अजित पवार यांच्यासोबत सत्ता स्थापनेचं नाटक केल्याचा आरोप झाल्यानंतर, देवेंद्र फडणवीस पुन्हा अडचणीत आहेत. भाजप चे माजी आमदार अनिल गोटे यांनी फडणवीस यांच्यावर 46 हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

या संदर्भात गोटे यांनी आपल्या अधिकृत लेटर हेडवर एक प्रत्रक प्रसिद्धीस दिले असून, ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. हे पत्रक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले असून, समृद्दी कॉरिडॉरची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या पत्रकात म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस यांनी किती पारदर्शक कारभार केला हे जाणून घेण्याचा महाराष्ट्राला अधिकार आहे. राज्यातील 46 हजार कोटी रुपयांच्या समृद्धी महमार्गाच्या 'पारदर्शक कारभाराची' आर पार चौकशी करा आणि त्यानंतरच राधेश्याम मोपलवार हे प्रकरण नेमकं काय आहे?, महाराष्ट्राच्या जनतेला समजले, असं अनिल गोटे यांनी आपल्या पत्रकात म्हटलंय. 

आणखी वाचा - भाजप नेत्याचेच विधान खोडून काढण्याची फडणवीसांवर आली वेळ

अनिल गोटे यांचे गंभीर आरोप

  • स्टेट बँकेकडून समृद्ध महामार्गासाठी कर्ज घेताना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे गहाण ठेवला.
  • पश्चिम महाराष्ट्रात मोठे पूर संकट आले आले होते. देवेंद्रजी, चंद्रकांत पाटील तिकडे गेले नाहीत. हेच जर, पश्चिम बंगालमध्ये घडले असते तर, अमित शहा तिकडे पळत गेले असते आणि हजार कोटींची मदत केली असती.
  • गोपीचंद पडळकर यांना सांगलीहून बारामतीला आणले निव्वळ पाडण्यासाठी
  • माझ्या लक्षवेधीवर राज्य सहकारी बँकेत 1 हजार 88 कोटी रुपयांची अनियमितता आहे, असे सहकारमंत्र्यांनी सभागृहात सांगितले होते. 
  • शरद पवार यांच्यावर आरोप करण्यात आलेले 25 हजार कोटी आले कोठून?
  • राधेश्याम मोपलवार हे प्रकरण आहे तरी काय?
  • मोपलवार यांच्या भ्रष्टाचारा संदर्भात पंतप्रधान कार्यालयाकडून मला अधिक माहिती विचारण्यात आली. 
  • अहवाल मागवण्यासाठी तात्कालिन सचिवांना सात स्मरणपत्रे पाठवली, पण मुख्य सचिवांनी उत्तर देणे टाळले 

आणखी वाचा - बहुचर्चित रामटेक बंगला पुन्हा भुजबळांकडे

कोण आहेत अनिल गोटे?
अनिल गोटे हे भाजपचे धुळे शहर मतदारसंघाचे दोनवेळा (2009, 2014) आमदार होते. तेलगी स्टॅम्प गैरव्यवहारात अनिल गोटे यांचे नाव आले होते. त्यांना 2003मध्ये अटक झाली आणि त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. त्यानंतर 2007मध्ये ते जामिनावर सुटले. त्यानंतर निवडणूक लढवून ते 2009मध्ये धुळ्याचे आमदार झाले. राज्यात 105 जागांवर भाजपला विजय मिळाल्यानंतर, अनिल गोटे यांनी खुले पत्र लिहून, फडणवीस यांच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp leader anil gote allegations on devendra fadnavis letter to cm