मुंबईतील अतिक्रमणावर आता आकाशातून नजर; ड्रोन, उपग्रहांद्वारे होईल सर्व्हेक्षण...

मुंबईतील अतिक्रमणावर आता आकाशातून नजर; ड्रोन, उपग्रहांद्वारे होईल सर्व्हेक्षण...

मुंबई : मुंबई असो की राज्यातील कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्था.. त्यांना दरवर्षी अतिक्रमण मोहिम राबवावीच लागते. एकदा अतिक्रमण हटवले, दंडात्मक कारवाई केली आणि काही दिवस थांबले की पुन्हा अतिक्रमण जैसे थे होतात. कितीही वेळा अतिक्रमण हटवले तरीही ती कीड कायमची हटतच नाही. अखेर पालिकेने आता अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरवले असून त्यासाठी ड्रोन तसेच उपग्रहांचाही वापर केला जाणार असल्याचे पालिकेतील अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबईतील अतिक्रमणावर यापुढे आकाशातून नजर ठेवण्यात येणार आहे. दर तीन ते सहा महिन्यांनी ड्रोन अथवा उपग्रहाच्या माध्यमातून संपुर्ण मुंबईचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यात शहरातील एखाद्या कोपऱ्यात बांधकामात बदल आढळल्यास त्यानुसार तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे.

हवाई सर्वेक्षणातून फक्त अतिक्रमणच नव्हे तर मुंबईतील भौगोलिक चढ उतारही समजणार आहे. त्यानुसार पावसाळी पाण्याचे निचरा करण्याचे नियोजन करता येणार आहे. तसेच, झोपडपट्यांचेही मॅपिंग होणार असून आपात्कालिन परीस्थित हे नकाशे वापरता येणार आहेत. परदेशात शहरांचे असे हवाई सर्वेक्षण करण्यात येते. अतिक्रमणांवर कारवाई करण्यासोबतच शहरनियोजनासाठीही त्याचा वापर केला जातो, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. 

भारतात आतापर्यंत अशा प्रकारचे काम झालेले नाही. त्यामुळे  हे काम करण्यास कंपन्या शोधण्यासाठी पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून स्वारस्याची अभिरुची मागण्यात आली आहे. 17 ऑगस्टपर्यंत कंपन्यांना पालिकेकडे माहिती सादर करता येणार आहे. शहरात शक्‍य असेल तेथे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात येईल. काही भागात ड्रोन वापरण्याची परवनागी न मिळाल्यास तेथे उपग्रहाच्या सहाय्याने सर्वेक्षण करण्यात येईल. 

  • दर तीन ते सहा महिन्यांनी हवाई सर्वेक्षण करण्यात येईल. त्यात संपुर्ण मुंबईचे द्विमितीय आणि त्रिमीतीय नकाशे तयार करण्यात येतील.
  • त्यात एखाद्या ठिकाणी बांधकामात पुर्वीपेक्षा फरक दिल्यास तत्काळ स्थानिक प्रभाग कार्यालयाला माहिती दिली जाईल.
  • यात पूर्वीचे आणि नंतरचे असे दोन्ही छायाचित्रही देण्यात येतील.
  • स्थानिक प्रभागाकडून पडताळणी करुन पुढील कारवाई करण्यात येईल.


आपात्कालीन परिस्थितीतही उपयोग
सर्वेक्षणातून उपलब्ध होणाऱ्या नकाशांच्या आधारे झोपडपट्यांच्या गल्ली बोळातील माहिती उपलब्ध होणार आहे. एखाद्या ठिकाणी आग तसेच इतर आपत्ती घडल्यास तेथपर्यंत मदत पोहचविण्यासाठी या छायाचित्रांचा वापर करता येणार आहे.
 

मिठीबाईच्या विद्यार्थ्यांना दिलासा नाहीच; सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेपास नकार...

खाड्यांवरही नजर
मुंबईच्या पुर्वेकडील सिमेला खाडी आहे. तर, उत्तरेकडील सिमाही खाडी आहे. या खाडीत अतिक्रमण होत असल्यास त्याचाही अंदाज या सर्वेक्षणातून येऊ शकणार आहे.

भारतात अशा प्रकारचे शहराचे सर्वेक्षण प्रथमच होत आहे. त्याबाबत माहिती घेण्यासाठी कंपन्यांकडून स्वारस्याची अभिरुची मागविण्यात आली आहे. त्याला प्रतिसादही मिळत आहे. त्याचा अभ्यास करुन पुढील प्रक्रिया करण्यात येईल'.
- व्ही.व्ही.आचरेकर, सहाय्यक आयुक्त, अतिक्रमण विभाग

----
संपादन : ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com