मुंबई महापौरांनी झोपू योजनेतील गाळे लाटलेत - किरीट सोमय्या

समीर सुर्वे
Monday, 28 September 2020

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी झोपू योजनेतील गाळे बळकावल्याचा आरोप करत भाजपने आज बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

मुंबई, ता. 28: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी झोपू योजनेतील गाळे बळकावल्याचा आरोप करत भाजपने आज बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. महापौरांनी राजिनामा द्यावा अशी मागणी भाजपने केली असून त्यावर बिनबुडाचे आरोप न करता ते सिध्द करुन दाखवावेत असे आव्हान महापौरांनी दिले आहेे.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महापौरांनी वरळी येथील एसआर प्रकल्पातील गाळे बळकावल्याचा आरोप केला आहे.या विरोधात सोमय्या यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते महापालिका मुख्यालयात आंदोलन करण्यासाठी येणार आले. मात्र, त्यांना मुख्यालयात प्रवेश नाकारल्याने त्यांनी मुख्यालया समोरील रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले.

महापौरांनी किमान सहा गाळे बळकावले असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. याबाबत मंगळवारी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावर महापौरांनी हे आरोप फेटाळून लावत सोमय्या यांच्याकडे पुरावे असतील तर एसआरए प्राधिकरणाकडे तक्रार दाखल करावी असे आव्हान दिले आहे .

महत्त्वाच्या बातम्या वाचा : 

-- राज्यात लवकरच रेस्टॉरंट सुरु होण्याची चिन्ह, मार्गदर्शक तत्व अंतिम झाल्यावर निर्णय

-- संजय राऊत यांचा ऑडिओ कोर्टात सादर; 'कंगनाचं नाव घेतलच नाही'

-- NCB येत्या काळात करू शकते मोठे खुलासे, आणखी कुणाला धाडले जाणार समन्स?

-- मुंबई महापालिकेने कंगनाची केली पोलखोल, अवैध बांधकामाबाबत कोर्टात दिली महत्त्वाची माहिती

-- 'काळे कायदे' ताबडतोब रद्द करा, काँग्रेसची आक्रमक भूमिका; कृषी कायद्यांविरोधात राज्यांनी कायदा करावा
 

( संपादन - सुमित बागुल ) 

corruption by mumbai mayor kishori pednekar in slum redevelopment says kirit somaiya


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corruption by mumbai mayor kishori pednekar in slum redevelopment says kirit somaiya